एक्स्प्लोर
Advertisement
रणबीर आणि माहिरा खानच्या व्हायरल फोटोंवर ऋषी कपूर म्हणतात...
रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या फोटोंवर आता रणबीरचे वडिल आणि दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या फोटोंवर आता रणबीरचे वडिल आणि दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ऋषी कपूर यांना रणबीरच्या व्हायरल फोटोंबाबत प्रश्न विचारण्यात आला. रणबीर तरुण, अविवाहित आणि बॅचलर आहे. तो वाटेल त्याला भेटू शकतो. लोकांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही दखल दिली तर ते चुकीचं ठरेल, असं ऋषी कपूर म्हणाले.
मी ते व्हायरल फोटो पाहिले असून त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मला त्यापासून दूर ठेवा. त्या फोटोत जे आहेत, त्यांनाच प्रश्न विचारा, असंही ऋषी कपूर म्हणाले.
दोघे एकमेकांना डेट करत आहेत का, असाही प्रश्न ऋषी कपूर यांना विचारण्यात आला. फोटोंच्या आधारावर असं सांगितलं जाऊ शकत नाही. असंही असू शकतं की तो तिला सोडण्यासाठी फक्त बाहेरपर्यंत गेला होता. ते एका अशा रेस्टॉरंटमध्ये गेले असतील जिथे स्मोकिंग करता येत नाही. अमेरिकेत कडक नियम आहे, ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करता येत नाही. मात्र याबाबत मला जास्त माहिती नसल्यामुळे त्यावर जास्त बोलणार नाही, असं स्पष्टीकरण ऋषी कपूर यांनी दिलं.
माहिरा आणि रणबीरचे हे फोटो ट्विटरवर पाहिल्याचं ऋषी कपूर यांनी सांगितलं. ऋषी कपूर यांचं फेसबुक किंवा इंस्टाग्राम अकाऊंट नाही.
संजय दत्तच्या बायोपिकच्या शुटिंगसाठी रणबीर अमेरिकेत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या सिनेमाच्या शुटिंगसाठी रणबीर न्यूयॉर्कमध्ये होता. या काळात माहिराही दुबईमध्ये होती. या भेटीनंतर दोघे जेव्हा हॉटेलच्या बाहेर निघाले तेव्हा त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं.
दुबईत झालेल्या ग्लोबल टीचर प्राईज या पुरस्कार सोहळ्यात दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. याच वेळचा दोघांचा गप्पा मारतानाचा व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल झाला होता.
या बातमीचे आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement