Rishabh Pant Accident : "आधी भावाकडे जा"; ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर नेटकऱ्यांकडून उर्वशी रौतेला ट्रोल
Rishabh Pant Urvashi Rautela : ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेलाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Urvashi Rautela Troll : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला भीषण अपघात झाला आहे. त्याला देहरादून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऋषभच्या अपघातानंतर आता नेटकऱ्यांनी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला (Urvashi Rautela) ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत चर्चेत आहेत. ते दोघे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्यामुळे आता ऋषभच्या भीषण अपघातानंतर नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
@UrvashiRautela pant bhaiya se mil ke aao.
— Shobhit Singh (@shobhit80686495) December 30, 2022
Our film #WaltairVeerayya Is A Pure Fans Stuff 🎥 Megastar @KChiruTweets @RaviTeja_offl @dirbobby @MythriOfficial @ThisIsDSP Thank you everyone 🫶🏻🫶🏻 #PressMeet pic.twitter.com/NNXSOKYGTc
— URVASHI RAUTELA🇮🇳 (@UrvashiRautela) December 27, 2022
नेटकऱ्यांनी उर्वशीवर निशाणा साधला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे,"आपल्या पंत भावाचा अपघात झाला आहे. आधी भावाला भेटून ये". दुसऱ्याने लिहिलं आहे,"क्षणाचा विलंब न करता आधी ऋषभकडे जा. तुझ्या हाताने औषध घेतल्यास त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल". तिसऱ्याने लिहिलं आहे,"ऋषभ भावड्या असं गाडी कोण चालवतं".
ऋषभचा अपघात कसा झाला?
दिल्लीहून घरी जात असताना ऋषभ पंतचा अपघात झाला आहे. अपघातादरम्यान तो गंभीर जखमी झाला असून त्याला देहरादून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कार चालवताना अचानक झोप लागल्याने त्याचं कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. अपघातादरम्यान ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता. तसेच पेटत्या वाहनातून बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची खिडकी तोडली.
उर्वशी-ऋषभचा वाद चर्चेत
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यातील वाद पाहायला मिळाला होता. एका मुलाखतीत उर्वशीने ऋषभ पंतचा उल्लेख केला होता. तर, यावरून चिडलेल्या ऋषभ पंतने तिला ‘ताई बस कर.. आता अजून किती खोटं बोलशील’ असा टोला लगावला होता. यावर उत्तर देताना उर्वशीने ऋषभला ‘छोटू भय्या’ म्हटलं होतं. दोघांमधील हा वाद अनेक दिवस चर्चेत होता. मात्र, त्यानंतर एका कार्यक्रमात उर्वशीने या सगळ्यावर माफी देखील मागितली होती. अर्थात तिने थेट ऋषभची माफी मागितली नसली, तरी तिने या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला.
संबंधित बातम्या