Ricky Pond: 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर थिरकला रिकी पाँड; नेटकरी म्हणाले, 'रिकी तात्या...'
'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावर आता सोशल मीडिया स्टार रिकी पाँड (Ricky Pond) देखील थिरकला आहे. रिकी पाँडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Ricky Pond: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेक नेटकरी आणि सेलिब्रिटी महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावर रिल्स तयार करुन सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या गाण्यावर आता सोशल मीडिया स्टार रिकी पाँड (Ricky Pond) देखील थिरकला आहे.
रिकी पाँडनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, मला या गाण्याबद्दल सांगा, 'मला वाटतंय मी छान डान्स केला आहे.मला या गाण्याची हुक स्टेप आवडली. ' रिकीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत.
रिकीच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
रिकी पाँडच्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, 'आपला रिकी तात्या' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'खुप छान'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला.
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली आहे. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अजय-अतुल यांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: