Richa Chadha Ali Fazal Marriage Date : रिचा चड्ढा- अली फजलच्या लग्नाची तारीख ठरली? शोधतायत वेडिंग व्हेन्यू
Richa Chadha Ali Fazal Marriage Date : रिचा आणि अली यांच्या अफेअरबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत, असं म्हटलं जातय.
Richa Chadha Ali Fazal Marriage Date : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha)आणि अली फजल (Ali Fazal) यांच्या जोडीची चर्चा सोशल मीडियावर होत असते. रिपोर्टनुसार, लवकरच रिचा आणि अली लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचा विवाह सोहळा मार्च 2022 मध्ये होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
रिचा आणि अली हे 2020 मध्ये लग्न करणार होते. परंतू कोरोनामुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली, असं म्हणलं जात आहे. रिपोर्टनुसार, त्यांचा सोहळा मार्च 2022 मध्ये मुंबई किंवा दिल्लीमध्ये होणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याला त्यांचे जवळचे मित्र मैत्रीणी आणि नातेवाईक हजेरी लावतील. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की, रिचा आणि अली हे मुंबईमध्ये नव्या घरात शिफ्ट झाले आहेत. सध्या ते दोघे वेडिंग व्हेन्यू शोधत आहेत, असं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
अली सध्या हॉलिवूडमधील एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिजी आहे. या चित्रपाटचे शूटिंग झाल्यानंतर रिचा आणि अली लग्नाची तयारी सुरू करतील. रिचा आणि अलीने 'फुकरे' आणि 'फुकरे रिटर्न्स' या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. फुकरे या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची ओळख झाली.
हे ही वाचा :
Bollywood Actress : आलिया, प्रियांका अन् कतरिना... एका चित्रपटासाठी एवढे मानधन घेतात 'या' अभिनेत्री