Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
Comedy King Johnny lever: हलाखीची परिस्थिती असूनही जॉनी लिव्हर यांनी टॅलेंटच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.

Johnny lever incredible journey: बॉलिवूडच्या इतिहासात विनोदविरांनी कॉमेडीमधून प्रेक्षकांच्या (Comedians) मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये कॉमेडियन्सची चर्चा होत आली आहे. काही कॉमेडियन्सचा थाट हा सुपरस्टार किंवा सिनेमाच्या मेन लीड कलाकारापेक्षा जास्त होता. कॉमेडियन्सच्या यादीत जॉनी लिव्हर यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये (Bollywood) काम केलं आहे. प्रेक्षकांना पोट धरुन हसण्यास जॉनी लिव्हर (Johnny Lever) यांनी अक्षरश: भाग पाडलं आहे. पण त्यांचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या दिवसांत (Entertainment) त्यांनी हलाखीचे दिवस काढले.
जॉनी लिव्हर हे सर्वात श्रीमंत विनोदविरांपैकी एक (Johnny lever once earned 600 rupyee sold pens)
80 आणि 90 च्या दशकात जॉनी लिव्हरने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. जॉनी लिव्हर हे सर्वात श्रीमंत कॉमेडियन्सपैकी एक आहेत. पण सुरुवातीला ते केवळ 600 रुपये कमवत होते. उदरनिर्वाह करण्यासाठी जॉनी लिव्हर यांना सुरुवातीच्या काळात रस्त्यावर पेन आणि ट्रेनमध्ये संत्री विकावी लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जॉनी लिव्हर केवळ सातवीपर्यंत शिकले आहेत. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1957 साली आंध्र प्रदेश येथील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला.
जॉनी लिव्हर यांचे वडील हिंदुस्तान यूनिलीव्हरमध्ये काम करत होते. जेव्हा जॉनी लिव्हर 18 वर्षांचे झाले होते, तेव्हा त्यांनी या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा त्यांना 600 रुपये पगार मिळत होता. सुरुवातीला मुंबईत उदरनिर्वाह करण्यासाठी जॉनी लिव्हर यांनी छोटी -मोठी कामे केली. त्यांना अभिनय करण्याचं खूप वेड होतं. सुरुवातीला त्यांनी रस्त्यांवर पेन विकण्याचं काम केलं होतं. पेन विकत असताना जॉनी लिव्हर विविध कलाकारांचे मिमिक्री करायचे. त्यांचा हटके अंदाज लोकांना आवडायचा.
जॉनी लिव्हर सुरुवातील स्टँड अप कॉमेडीही करायचे. त्यांच्या कलाकृतीवर दिवंगत अभिनेता सुनील दत्त यांची नजर पडली. त्यांनी 1982 साली 'दर्द का रिश्ता' या सिनेमात जॉनी लिव्हर यांना काम करण्याची संधी दिली. जॉनी लिव्हर यांना खरी ओळख 1993 साली रिलीज झालेल्या 'बाजीगर' या सिनेमातून मिळाली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 'करण अर्जून', 'गोलमाल 3', 'फिर हेरा फेरी', 'कुछ कुछ होता हैं', 'जुदाई' यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमात काम केलं. जॉनी लिव्हर यांच्या नेटवर्थबाबत बोलायचं झाल्यास, टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, त्यांची टोटल नेटवर्थ 277 कोटी इतकी आहे.
1984 साली जॉनी लिव्हर यांनी सुजाता लिव्हरसोबत लग्न केलं. या कपलला दोन मुलं आहेत. मुलगी जेमी लिव्हर आणि मुलगा जेसी लिव्हर. दोघेही मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















