आत्महत्याच करावी असं वाटायचं; रियाची आई संध्या यांनी सौडलं मौन
रियाच्या जामिनानंतर तिची आई संध्या यांनी आपलं मौन सोडलं आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या, मला वाटलं आता सगळं संपलं आहे. रिया आणि शौविकला अटक झाल्यानंतर मला वाटू लागलं की आता आत्महत्याच करून संपवून टाकावं आयुष्य.
जूनच्या 14 तारखेपासून रिया चक्रवर्ती हे नाव भारतभरात सतत घुमतं आहे. आधी सुशांतची प्रेयसी म्हणून आणि नंतर आरोपी म्हणून. सुरुवातीला सुशांतची साथीदार म्हणून तिच्याकडे सहानुभूतीने पाहिलं गेलं. पण नंतर त्यात आलेले आर्थिक कंगोरे.. अमली पदार्थाचे संदर्भ यातून रिया अधिकाधिक काळवंडली. याचा थेट परिणाम रियाच्या आईवर संध्यावर होत होता.
इतके दिवस तिची आई फार काही बोलली नाही. तिची आई संध्या चक्रवर्ती सोडल्या तर चक्रवर्ती कुटुंबीयांतला प्रत्येक घटक आरोपाच्या सुईखाली होता. आधी रिया.. मग रियाचा भाऊ शौविक आणि त्यानंतर तिचे वडील. सुशांतसोबत रिया आणि शोविकने भागीदारी करून कंपनी स्थापन करण्यावरून उठलेल्या बातम्या आणि त्यातून तिचे वडीलही त्यात कसे सहभागी होते, अशी उठवली गेलेली आवई यातून संपूर्ण चक्रवर्ती कुटुंबीय एकाचवेळी आरोपांच्या फैरीखाली सापडलं.
हे आरोप कमी म्हणून की काय, तर माध्यमकर्मींनीही त्यांचा यथेच्छ छळ मांडला. रिया, शौविक आणि तिचे वडील यांना मिळेल तिथे थांबवून प्रश्नांची सरबत्ती लादली गेली. हे सगळं चक्रवर्ती कुटुंबीयांतली गृहिणी संध्या पाहात होत्या. त्यावर आजतागायत त्या काहीच बोलल्या नाहीत. मात्र, त्यांनी आपलं मौन आता सोडलं आहे.
सुशांतसिंग राजपूत प्रकरण : रिया चक्रवर्ती हिची जामीन मिळाल्यानंतर तुरूंगातून सुटका
रियाच्या जामिनानंतर त्यांनी आपलं मौन सोडलं आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या, मला वाटलं आता सगळं संपलं आहे. सगळे कुटुंबीय एकाचवेळी आरोपांच्या फैरीत आले. एकिकडे रियावर नको ते आरोप लगावले जात होते. तर त्याचेळी शौविकवरही आरोप होत होते. त्यामुळे याला सामोरं कसं जायचं हा प्रश्न होता. खूप एकटं वाटत होतं. रिया आणि शौविकला अटक झाल्यानंतर तर यात वाढ झाली. आणि मग मला वाटू लागलं की आता आत्महत्याच करून संपवून टाकावं आयुष्य. कारण सगळंच संपतंय की काय असं वाटलं. पण जगात देव असतो म्हणतात ते खरं आहे. आता रिया आली आहे. शौविकची मात्र काळजी वाटतेय', असं त्या म्हणतात.
चक्रवर्ती कुटुंबियांना या सर्वात वाळीतच टाकलं गेलं नाही तर त्यामुळे आमचं कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झालं. हे पुन्हा कसं जुळून येईल याची शाश्वती नव्हती. म्हणून संध्या यांनी थेरपीही सुरू केली. आता जवळपास 28 दिवसांच्या तुरुंगवासानंतर रिया घरी पोहचली आहे. त्यामुळे बरं वाटलंय, असं त्या म्हणतात. रिया बाहेर आली असली तरी शौविकची काळजी वाटते आहेच, असंही त्या सांगतात.
Rhea Chakraborty gets bail | काल संध्याकाळी सुटका; मात्र रिया रात्री दीड वाजता घरी