NCB Drug Case Showik Gets Bail : रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकचा जामीन मंजूर, तीन महिन्यांनंतर तुरूंगातून बाहेर येणार
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने प्रदीर्घ चौकशीनंतर पाच सप्टेंबरला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक याला अटक केली होती.तिन महिन्यानंतर शौविकची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
मुंबई : सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला एनडीपीएस कोर्टाने आज जामीन मंजूर केला. लांबलचक चौकशीनंतर शौविकला एनसीबीने 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. म्हणजेच सुमारे तीन महिन्यांनंतर शौविक तुरूंगातून बाहेर येईल.
रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ यांच्यासह सुमारे वीस जणांवर एनसीबीने ड्रग्जची खरेदी-विक्री प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला एनसीबीनेही अटक केली होती. नंतर तिला जामीन मंजूर झाला.
सुशांतसिंह राजपूत यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा कथित प्रकार समोर आला होता. या संदर्भात एनसीबीने गुन्हा दाखल करून अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी केली.
एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि अर्जुन रामपाल यांच्यासह अनेक दिग्गजांची वेगवेगळ्या वेळी चौकशी केली आहे.
संबंधित बातम्या :
पंतप्रधान मोदींना मागे टाकून सुशांत बनला मोस्ट सर्च सेलिब्रिटी, रिया चक्रवर्ती तिसऱ्या स्थानावर!
मला माफ कर.. माझ्यामुळे तुलाही टीकेला सामोरं जावं लागलं, अंकिता लोखंडेची बॉयफ्रेण्डसाठी पोस्ट