REVIEW : राणी लक्ष्मीबाईंसाठी एकदा 'मणिकर्णिका' पाहा
तिहास समोर असतानाही गोष्टीमध्ये अनेक कच्चे दुवे दिसतात. विजयेंद्र प्रसाद यांनी हे काम कोणीतरी गळ घातली म्हणून करावं अशा पद्धतीने केल्यासारखं वाटतं. म्हणूनच सिनेमाचा पूर्वार्ध कंटाळवाणा होतो. पण गोष्टीतली आणि पटकथेतली ही कसर प्रसून जोशींच्या संवादांनी भरुन काढली आहे. प्रसून जोशी यांनी लिहिलेले संवाद सिनेमात प्राण ओततात.शंकर-एहसान-लॉय यांची गाणी चांगली आहेत मात्र त्याचा अतिरेक झाला आहे. तो मोह आवरायला हवा होता.
कंगना रानौत ही वन वूमन आर्मी आहे. ती नडते, ती लढते आणि ती जिंकतेही. तिचं हेच जिंकणं 'मणिकर्णिका' सिनेमात पाहायला मिळतं. राणी लक्ष्मीबाईंचा जोश, आवेश कंगनाने प्रेक्षकांच्या हृदयाला भिडेल अशा भाषेत मांडलाय. कधी भाषा शब्दांची असते तर कधी अंगावर येणाऱ्या दृश्यांची. सिनेमातला अगदी लहानात लहान प्रसंगही कसा उठावदार होईल याची योग्य ती काळजी घेतली आहे. त्यासाठी बनवलेले भव्य सेट्स आणि नीता लुल्लाची वेशभूषा लाजवाब आहे.
अर्थात या सर्व गोष्टींचं श्रेय दिग्दर्शक क्रिशलाही तेवढंच द्यावं लागेल, कारण सिनेमाचा शेवट त्याने केला नसला तरी सुरुवात त्याच्यापासून झाली होती. त्यामुळे हा सिनेमा क्रिशने केलेल्या संस्कारात वाढला आहे हे विसरुन चालणार नाही. सिनेमाची गोष्ट 'बाहुबली'कार के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. बाहुबलीसारखं फिक्शन लिहिताना त्यांची लेखणी ज्या पद्धतीने चालली होती ती जादू इथं दिसत नाही.
इतिहास समोर असतानाही गोष्टीमध्ये अनेक कच्चे दुवे दिसतात. विजयेंद्र प्रसाद यांनी हे काम कोणीतरी गळ घातली म्हणून करावं अशा पद्धतीने केल्यासारखं वाटतं. म्हणूनच सिनेमाचा पूर्वार्ध कंटाळवाणा होतो. पण गोष्टीतली आणि पटकथेतली ही कसर प्रसून जोशींच्या संवादांनी भरुन काढली आहे. प्रसून जोशी यांनी लिहिलेले संवाद सिनेमात प्राण ओततात.शंकर-एहसान-लॉय यांची गाणी चांगली आहेत मात्र त्याचा अतिरेक झाला आहे. तो मोह आवरायला हवा होता.
मात्र त्यात भारत रहना चाहिये आणि विजयी भव ही दोन गाणी भाव खावून जातात. सिनेमातले अॅक्शन सिक्वेन्स भन्नाट जमले आहेत, खास करुन जेव्हा राणी लक्ष्मीबाई यांचे सीन्स. युद्धाचे ते प्रसंग पाहताना रक्त सळसळतं. डॅनी, कुलभूषण खरबंदा, अतुल कुलकर्णी, अंकिता लोखंडे, सुरेश ओबेरॉय, वैभव तत्ववादी अशी मोठी स्टारकास्ट या सिनेमात आहे. पण तरीही कॅमेरा पूर्णवेळ फक्त आणि फक्त कंगनावर फिरत राहातो. (सोनू सुदने या कारणासाठीच हा सिनेमा अर्ध्यात सोडला अशी कुजबुज इंडस्ट्रीत आजही ऐकायला मिळते.)
वैभव तत्ववादीच्या वाट्याला चांगली भूमिका आली आहे. एक गाणंही त्याच्यावर चित्रित झालं आहे. या गाण्यात कंगनाही नाचताना दिसते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता रामेश्वर भगत आणि सुरज जगताप या मराठमोळ्या जोडीनं या सिनेमाच्या संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. पूर्वार्धात संथ होणाऱ्या सिनेमाला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न या जोडगोळीनं केला आहे.
या साऱ्या जमेच्या आणि खटकणाऱ्या गोष्टी असल्या तरी मणिकर्णिका हा सिनेमा किमान एकदा तरी पाहायलाच हवा असा आहे. राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास हा एक भाग असला तरी सिनेमा म्हणून तुमचं मनोरंजन करण्यात 'मणिकर्णिका' कमी पडत नाही. या सिनेमाला मी देतोय साडेतीन स्टार्स.