एक्स्प्लोर

Remo Dsouza Heart-Attack: कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका; ICU मध्ये दाखल

Remo Dsouza Heart-Attack: नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी एबीपी न्यूजच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अहमद खान यांचा वृत्ताला दुजोरा

बॉलिवूडचे आणखी एक नृत्यदिग्दर्शक आणि रेमोचे सिनिअर अहमद खान यांनी एबीपी न्यूजच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रेमोने स्वत: अहमद यांच्या बरोबर 6 वर्षे काम केले आहे. त्याने अहमद खानला बर्‍याच चित्रपटात मदत केली. रेमो आणि अहमद दोघेही एकमेकांच्या अगदी जवळचे आहेत. रेमोची पत्नी लिज डिसूझाही रूग्णालयात हजर आहे. रेमोची अँजियोग्राफी झाली असून तो आयसीयूमध्ये दाखल आहे.

रेमो डिसूझा कोण आहे?

रेमो डिसूझा हा बॉलिवूडमधील दिग्गज कोरिओग्राफर आहे. त्याने आतापर्यंत अनेक बड्या चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केलं आहे. 1995 मध्ये बॉलिवूडमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली, त्यानंतर त्यांनी 2000 मध्ये दिल पे मत ले यार या चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले. त्यानंतर त्यांनी आत्तापर्यंतच्या अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये नृत्य कोरिओग्राफ केले आहे. त्याला तहजीब, स्टुडंट ऑफ द इयर, ये जवानी है दिवानी, एबीसीडी 2, बाजीराव मस्तानी आणि कलंक या चित्रपटांसाठी गौरविण्यात आले आहे.

चित्रपट दिग्दर्शनातही पाऊल कोरिओग्राफीबरोबरच रेमोने गेल्या काही वर्षांपासून चित्रपट दिग्दर्शनातही पाऊल ठेवले आहे. फ्लाइंग जूट, रेस 3, सरप्लस, एबीसीडी, एबीसीडी 2 आणि स्ट्रीट डान्सर सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केले आहे. याशिवाय तो अनेक रियलिटी शोजमध्येही दिसला आहे. त्याने डान्स इंडिया डान्सच्या बर्‍याच सीझनमध्ये परीक्षक म्हणून काम केलं आहे. यापूर्वीच त्याने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले होते. परंतु, या शोच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचला. डान्स इंडिया डान्स व्यतिरिक्त तो झलक दिखला जा, नच बलिये आणि डान्स प्लस सारख्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
CM Yogi Adityanath On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget