Rekha Reveled Her Secret : 'मी अपवित्र आणि वासनेने भरलेली आहे..'; भर मुलाखतीत स्टार अभिनेत्रीने दिली होती कबुली
Rekha Reveled Her Secret : अभिनेत्री रेखा यांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांमध्ये दिसून येते. त्यांच्या आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा सुरू असतात.
Rekha Reveled Her Secret : बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्रींची त्यांच्या कामासोबत वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा रंगली होती. अभिनेत्री रेखा यांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांमध्ये दिसून येते. त्यांच्या आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा सुरू असतात. सिमी ग्रेवालच्या शोमध्ये रेखा यांनी काही वर्षांपूर्वी सांगितले होते, तेच पुन्हा ट्रेंडिंगमध्ये आहे. रेखाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणतीही गोष्ट लपवली नाही आणि हीच बाब तिला इतरांपेक्षी वेगळी करते.
रेखा यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिची कारकीर्द खूप यशस्वी होती पण प्रेमात ती दुर्दैवी ठरली आहे. रेखा यांनी सांगितले होते की, मला माझ्या लहानपणी वडिलांचं प्रेम मिळालं नाही, तरुणपणीदेखील हवं असणारे प्रेम मिळाले नाही आणि लग्न झाल्यावरही मला माझ्या पतीची साथ मिळाली नाही. सिमी ग्रेवालच्या शोमध्ये तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या.
रेखाने सांगितली अनेक गुपितं...
अभिनेत्री रेखा यांनी आपलं आयुष्य कोणापासून लपवून ठेवलेलं नाही. अनेक बाबतीत रेखा नेहमीच बोल्ड राहिली असून त्यांच्या चाहत्यांना ही स्टाईल आवडते. रेखाने अनेक मुलाखतींमध्ये वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने सांगितले. रेखा यांनी एकदा सिमी ग्रेवालच्या शोमध्ये हजेरी लावली होती. नैराश्याने ग्रासले असताना ड्रग्ज आणि मद्याच्या आहारी गेल्याचे रेखा यांनी कबूल केले होते.
'टाईम्स नाऊ'ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री रेखाने सांगितले की, मी खूपच अशुद्ध महिला आहे. मी वासनेने भरलेली आहे. कोणासोबत? तर, माझ्या आयुष्यासोबत मी वासनेने भरली असल्याचे रेखाने सांगितले. सिमी ग्रेवालने रेखा यांना दुसऱ्या लग्नाबाबत विचारले तेव्हा रेखाने, कोणासोबत पुरुषासोबत असा उलट प्रश्न केला.
रेखाच्या या उलट प्रश्नावर सिमी ग्रेवाल आश्चर्यचकित झाली. तिने सांगितले की, हो मी फक्त पुरुषासोबत लग्नाबाबत विचारेल, एखाद्या स्त्रीसोबत नाही. तर रेखा म्हणाली, 'का?' मी स्त्रीशी लग्न का करू शकत नाही?' रेखाचे उत्तर आश्चर्यकारक होते, असे सिमी ग्रेवाल यांनी म्हटले होते. रेखा पुढे म्हणाली, 'माझ्या मनात, मी स्वतःशी, माझ्या व्यवसायाशी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांसोबत लग्न केले आहे.
रेखा यांचा विवाह झाला होता?
रेखा यांनी 1990 मध्ये व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, लग्नाच्या काही महिन्यातच मुकेश यांनी आत्महत्या केली. त्यानंतर रेखा यांनी दुसऱ्यांदा विवाह केला नाही. रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या प्रेम प्रकरणाची गोष्ट मान्य केली होती. असं म्हणतात की, अमिताभ यांच्यासाठी रेखा यांच्या मनात आजही प्रेम आहे. रेखा यांच्यासोबत त्यांची स्वीय सहाय्यक फरझाना कायम सोबत दिसून येते. फरझाना या रेखा यांच्या आयुष्यातील चढ-उतार, सुख-दु:ख यांची साक्षीदार राहिली आहे.