Reema Lagoo Birth Anniversary : बॉलिवूडची ‘कूल आई’! रीमा लागूंचा अभिनय पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती! जाणून घ्या अभिनेत्रीविषयी खास गोष्टी..
Reema Lagoo Birthday : रीमा लागू यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटातून केली होती. अनेक वर्षे त्यांनी मराठी रंगभूमीवरही काम केले होते.

Reema Lagoo Birthday : बॉलिवूडमध्ये आईची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री रीमा लागू (Reema Lagoo) यांची आज जयंती आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दुःखी आणि अश्रू गाळणाऱ्या आईची प्रतिमा रीमा लागू यांनी आपल्या हसतमुख आधुनिक आईच्या भूमिकांनी मोडीत काढली होती. रीमा लागू यांचे खरे नाव नयन भडभडे होते. त्यांचा जन्म 21 जून 1958 रोजी झाला होता. रीमा लागू यांच्या आई मंदाकिनी भडभडे यादेखील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होत्या. त्यांना बालपणापासूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले होते.
आपण अभिनय क्षेत्रातच करिअर करायचे हे त्यांनी बालपणीच ठरवले होते. शिक्षणादरम्यान रीमा यांनी अभिनयाला सुरुवात केली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी व्यावसायिक अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. रीमा लागू यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटातून केली होती. अनेक वर्षे त्यांनी मराठी रंगभूमीवरही काम केले, त्यानंतर 1980 मध्ये त्यांनी ‘कलयुग’ या चित्रपटाद्वारे सहायक अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
बॉलिवूडची लोकप्रिय आई!
रीमा लागू यांनी आपल्या चित्रपट प्रवासात तब्बल 25हून अधिक चित्रपटांमध्ये 'आई'ची भूमिका साकारली होती. अनेक बॉलिवूड चित्रपटात रीमा लागू मुख्य अभिनेत्याच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. इतकंच नाही, तर रीमा लागू यांनी तब्बल सात वेळा सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटांमध्ये ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘जुडवा’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. सलमान व्यतिरिक्त रीमा लागू मोठ्या पडद्यावर अजय देवगण, शाहरुख खान, करिश्मा कपूर, संजय दत्त, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, गोविंदा, उर्मिला मातोंडकर आणि काजोल यांच्या आईची भूमिका साकारली होती.
...म्हणून श्रीदेवींनी कापली रीमा लागूंची भूमिका!
रीमा लागू यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये नेहमी सहायक भूमिका साकारल्या होत्या. या सहक=यक भूमिकांमध्येही त्या इतक्या जीव ओतून काम करायच्या की, त्यामुळे मुख्य भूमिका साकारणारा कलाकारही झाकोळला जायचा. त्यांचा अभिंय पाहून मोठमोठ्या कलाकारांनाही घाम फुटायचा. अशीच एक घटना रीमा 'गुमराह' चित्रपट करत असताना घडली होती. या चित्रपटात रीमा यांना अभिनेत्री श्रीदेवीच्या आईची भूमिका साकारायची होती. असे म्हटले जाते की, रीमा यांचा जबरदस्त अभिनय पाहून श्रीदेवी देखील इनसिक्योर झाल्या होत्या. म्हणूनच श्रीदेवी यांनी त्यांच्या भूमिकेला अनेक ठिकाणी कात्री लावली होती.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली 'सिटाडेल'ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
