एक्स्प्लोर
Advertisement
नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, शेतकऱ्यांना नाही : रविना
आपल्या ट्वीटचा विपर्यास करण्यात आला. शेतकऱ्यांना नाही, तर शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असं म्हणाल्याचं तिने सांगितलं.
मुंबई : शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या अभिनेत्री रविना टंडनने स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या ट्वीटचा विपर्यास करण्यात आला. शेतकऱ्यांना नाही, तर शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असं म्हणाल्याचं तिने सांगितलं.
रविना टंडन काय म्हणाली?
शेतकरी आंदोलनाच्या एका बातमीवर कमेंट करत रविनाने ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये शेतमाल फेकून देतानाची दृष्य दिसत होती.
"अतिशय क्लेशदायक घटना आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणं दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये.", असं ट्वीट रविना टंडनने केलं होतं.
रविनाचं स्पष्टीकरण
या ट्वीटनंतर रविना टंडनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मात्र त्यानंतर तिने एबीपी माझाकडे स्पष्टीकरण देत आपला रोष हा शेतकऱ्यांविरोधात नसल्याचं सांगितलं.
''मी शेतकऱ्यांप्रती नेहमीच संवेदनशील आहे, माझी टाईमलाईन तुम्ही चेक करा, शेतकरी आत्महत्या असो किंवा कर्जबाजारीपणाचा विषय असो, नेहमीच शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. पण शेतमालाची जी नासधूस होत आहे, त्याविरोधात रोष आहे,'' असं रविनाने सांगितलं.
Please do understand a tweet before replacing the words and twisting them in your reporting @eSakalUpdate and @abpmajhatv . I said “ ANYONE “ and not FARMERS ,antisocials to be arrested ! pic.twitter.com/1F8hWzqVhy
— Raveena Tandon (@TandonRaveena) June 4, 2018
Thank you @abpmajhatv for clearing the misunderstanding! 🙏🏻 . Have always stood by the https://t.co/2ghD9JOfyS my timeline from many years.Have always voiced my concern over suicides and debt and Govts neglect. I am only against any kind of hard earned produce going to waste. https://t.co/A2W4NPSVO5
— Raveena Tandon (@TandonRaveena) June 4, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
विश्व
राजकारण
बातम्या
Advertisement