Happy Birthday Raveena : तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर; एकासोबत साखरपुडा पण प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्री रवीनाचं टोकाचं पाऊल, डिप्रेशनचाही शिकार
Happy Birthday Raveena Tandon : 90 च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री रवीना टंडन तीन वेळा दिग्गज अभिनेत्यांच्या प्रेमात पडली, पण तिची प्रेमकहाणी अपूर्णच राहिली.
Raveena Tandon Birthday Special : 90 च्या दशकातील स्टार अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे रवीना टंडन. 90 च्या दशकात अभिनेत्री रवीना टंडनने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्री रवीना टंडनने तिचा अभिनय, सौंदर्य आणि नटखट स्वभाव याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं. रवीना टंडन तीन वेळा दिग्गज अभिनेत्यांच्या प्रेमात पडली, पण तिची प्रेमकहाणी अपूर्णच राहिली. यापैकी एका अभिनेत्यासोबत तिचं लग्न होणार होतं. रवीना टंडनचा आज 26 ऑक्टोबर रोजी 49 वा वाढदिवस आहे, यानिमित्त तिच्याबद्दलच्या रंजक गोष्टी जाणून घ्या.
एकासोबत साखरपुडा पण प्रेमात धोका
रवीनाचा एका अभिनेत्यासोबत साखरपुडाही झाला होता. पण, रवीनाने या अभिनेत्याला तिच्याच मैत्रिणीसोबत चीट करताना पाहिलं. रवीनाची मैत्रिण आणि अभिनेता लपून-छपून एकमेकांना डेट करत होते. यानंतर रवीनाने लग्न मोडलं. यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेल होती आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही मीडिया रिपोर्टमध्ये बोललं जातं.
तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर
अभिनेत्री रवीना टंडनचं नाव तीन स्टार अभिनेत्यासोबत जोडलं गेलं. रवीनाचं बॉलीवूडमधील तीन अभिनेत्यांसोबत अफेअर होतं, पण तिला प्रत्येक वेळा प्रेमाने चकवा दिला. रवीना टंडनचं अक्षय कुमार, अजय देवगण आणि सनी देओलसोबतच अफेअर खूप चर्चेत होतं. फार कमी लोकांना माहित आहे की, तिने एकासोबत एंगेजमेंटही केली होती, पण नंतर त्यांचं नातं तुटलं आणि ती डिप्रेशनमध्ये गेली.
प्रेमात धोका मिळाल्यावर आत्महत्येचा प्रयत्न
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रेमात फसवणूक झाल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. मात्र, रवीना प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सर्व करत असल्याचे अभिनेत्याने त्यावेळी आपल्या एका वक्तव्यात म्हटले होते. अजय देवगणकडून प्रेमात फसवणूक झाल्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, असं मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगितलं जातं. पण, रवीना फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सर्व करत असल्याचे अजयने त्यावेळी एका वक्तव्यात म्हटलं होतं.
अभिनेत्याने मैत्रिणीसोबत मिळून केलं चीट
रवीना टंडनने अक्षय कुमारसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मोठ्या पडद्यावर ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. चित्रपटांमध्ये एकत्र काम करता करता दोघांचं प्रेम जडलं. 90 च्या दशकात यांच्या प्रेमाची खूप चर्चा होती. पण, नंतर अक्षयने रवीनाला प्रेमात धोका दिला. रवीनाची मैत्रिण अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही तो डेट करत होता, यामुळे दोघांचं नातं तुटलं. अक्षय आणि रवीनाचा साखरपुडाही झाला होता, पण अक्षयने चीट केल्यामुळे हे नातं तुटलं. त्यानंतर अक्षयचं नावं रेखासोबतही जोडलं गेलं होतं.
यानंतर रवीना टंडनने 22 फेब्रुवारी 2004 रोजी उदयपूर पॅलेसमध्ये अनिल थडानीशी लग्न केलं. तिला चार मुलं आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :