(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rashmika Mandanna: चाहत्यावर भडकली रश्मिका; रस्त्यात गाडी थांबवून घेतली शाळा, व्हिडीओ व्हायरल
रश्मिका ही सध्या तिच्या Vairsu या तमिळ चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं ऑडिओ लाँच करण्यासाठी रश्मिका चैन्नईमधील एका कार्यक्रमामध्ये गेली होती.
Rashmika Mandanna: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. रश्मिका ही सध्या तिच्या Vairsu या तमिळ चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं ऑडिओ लाँच करण्यासाठी रश्मिका चैन्नईमधील एका कार्यक्रमामध्ये गेली होती. यावेळी रश्मिका तिच्या चाहत्यावर भडकली.
24 डिसेंबर रोजी नेहरू इनडोअर स्टेडियम, चेन्नई येथे 'वारीसु'चा ऑडिओ लॉन्च कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानंतर रश्मिका कारमध्ये बसून हॉटेलकडे निघाली. यादरम्यान काही चाहते तिला फॉलो करत असल्याचे तिने पाहिले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रश्मिका ही तिची कार थांबवते आणि चाहत्याशी बोलते. हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्यामुळे रश्मिकानं चाहत्याला फटकारले. यानंतर चाहत्याने हेल्मेट घातले.
पाहा व्हिडीओ:
I Still Wounder , How one can hate a Human being Like Our @iamRashmika 🥺🤌pic.twitter.com/i0kaeVB3Af
— × Roвιɴ Roвerт × 🕊️ (@PeaceBrwVJ) December 25, 2022
रश्मिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी रश्मिकानं चाहत्याला दिलेल्या या सल्ल्याचं कौतुक करत आहेत.
रश्मिकाचे आगामी चित्रपट
रश्मिका मंदनाच्या Vairsu या चित्रपटाचे दिग्दर्शन वामशी पैडिपल्ली यांनी केले आहे. या चित्रपटात विजय आणि रश्मिका यांच्या व्यतिरिक्त शाम, प्रभू आणि प्रकाश राज हे स्टार्स प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रश्मिका मंदान्ना मिशन मजनू या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. हा स्पाय-थ्रिलर चित्रपट 20 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
रश्मिकाला पुष्पा या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तिचा गुडबाय हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रश्मिकासोबतच अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, एली अविराम, सुनील ग्रोवर, साहिल मेहता आणि पावेल गुलाटी या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. विकास बहल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: