एक्स्प्लोर
दीपिकासमोर टेबलवर चढून रणवीर सिंहचा भांगडा, व्हिडिओ वायरल
या पार्टीमध्ये रणवीर आणि दीपिकाने एकाच रंगाचे कपडे घातल्यामुळे साऱ्यांचं लक्ष त्यांच्याकडे होतं. या दरम्यानचे रणवीर आणि दीपिकाचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.

मुंबई : बॉलीवूड स्टार रणवीर सिंह आपल्या डान्स, अॅक्टिंग आणि फॅशन यासाठी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या नवनवीन डान्स स्टाईलने चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरणारा रणवीर आपल्या डान्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता तर त्याचा टेबलावर उभं राहून डान्स करतानाचा व्हिडिओ सगळीकडे वायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये रणवीर सिंह‘दिल धडकने दो’ चित्रपटातील ‘गल्ला गुडिया’ या गाण्यावर टेबलावर उभं राहून डान्स करताना दिसत आहे. रणवीरचा हा व्हिडिओ बहीण रितिकाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमधील आहे. पार्टीमध्ये रणवीर सिंगनं बहीण रितिकासाठी वाढदिवसाचं गाणंसुद्धा गायलं. त्यानंतर त्याने ऋषी कपूर यांच्या ‘बोलो ओम शांति ओम’ हे गाणंही म्हटलं.
या पार्टीत दीपिका पदुकोणही रणवीर बरोबर एकत्र दिसले. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये रणवीर आणि दीपिकाने एकाच रंगाचे कपडे घातल्यामुळे साऱ्यांचं लक्ष त्यांच्याकडे होतं. या दरम्यानचे रणवीर आणि दीपिकाचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक























