Ranveer Singh : 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये 'देव'च्या भूमिकेत दिसणार रणवीर सिंह? दीपिका पादुकोणसोबत स्क्रीन शेअर करणार
Ranveer Singh in Brahmastra 2 : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) 'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमात रणवीर सिंहची एन्ट्री होणार आहे.
Ranveer Singh in Brahmastra 2 : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. 'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमात रणवीर सिंह 'देव'च्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
'ब्रह्मास्त्र' या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं होतं. 2022 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमातील रणबीरचं काम प्रेक्षकांना आवडलं. या सिनेमाच्या यशानंतर निर्मात्यांनी 'ब्रह्मास्त्र 2'ची घोषणा केली. या सिनेमासोबत रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोणचं (Deepika Padukone) नाव जोडलं गेलं आहे. 'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमात दीपिका पादुकोण रणवीर सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे.
'ब्रह्मास्त्र 2'मध्ये रणवीर सिंहची एन्ट्री?
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. रणवीर सिंहच्या भूमिकेवरुन सध्या खूप चर्चा होत आहेत. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, रणवीर सिंहने 'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमासाठी होकार दिला आहे. या सिनेमात रणवीर 'देव'च्या भूमिकेत दिसणार आहे. 2025 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी 'डॉन 3' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रणवीरने अद्याप 'ब्रह्मास्त्र' या सिनेमासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही.
आलिया भट्ट आणि रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमासाठी रणवीर सिंहआधी 'केजीएफ' फेम यशला विचारणा झाली होती. तसेच हृतिक रोशनलादेखील या सिनेमासाठी विचारणा झाली होती. 'ब्रह्मास्त्र 2'नंतर 'ब्रह्मास्त्र 3' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये रणवीरला पाहायला चाहते उत्सुक आहेत.
'ब्रह्मास्त्र' या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते. तर अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. तसेच बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) झलकही प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळाली. आता रणवीरचं नावदेखील या सिनेमासोबत जोडलं गेलं आहे. तो शिवाचे वडील देव यांच्या भूमिकेत दिसू शकतो.
'ब्रह्मास्त्र 2'च्या शूटिंगला 2025 मध्ये होणार सुरुवात
'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमाच्या शूटिंगला 2025 मध्ये सुरुवात होणार आहे. रणवीर सध्या बैजू बावरा या सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्यानंतर तो संजय लीला भन्साळींच्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करणार आहे. 2025 च्या सुरुवातीला तो डॉन 3 चं शूटिंग करणार आहे. तर मध्यात 'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमाचं शूटिंग करणार आहे.
संबंधित बातम्या