एक्स्प्लोर
दीपिका-रणवीरचं विराट-अनुष्काच्या पावलावर पाऊल?
'मान्यवर' या लग्नाचे पेहराव तयार करणाऱ्या ब्रँडच्या जाहिरातीत विराट आणि अनुष्कापाठोपाठ दीपिका-रणवीर झळकण्याची चिन्हं आहेत.
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे सध्या बॉलिवूडमधलं हॉट कपल मानलं जातं. दोघांनी अद्यापही आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलणं टाळलं असलं, तरीही चाहत्यांनी दोघांचं शुभमंगल होणार, ही अटकळ बांधली आहे. त्यातच दीपिका-रणवीर हे दोघं विराट-अनुष्काच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे.
'मान्यवर' या लग्नाचे पेहराव तयार करणाऱ्या ब्रँडच्या जाहिरातीत विराट आणि अनुष्कापाठोपाठ दीपिका-रणवीर झळकण्याची चिन्हं आहेत. 'मान्यवर'ने आपल्या जाहिरातीसाठी दोघांना संपर्क साधल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये पाहायला मिळत आहे. मात्र रणवीर-दीपिका अद्याप आपलं उत्तर कळवलेलं नाही.
विराट आणि अनुष्का यांनीही आपल्या नात्याविषयी अशाचप्रकारे अळीमिळी गुपचिळी बाळगली होती. त्यानंतर अचानक 'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकून त्यांनी आयुष्यभरासाठी आणाभाका घेणार असल्याचे संकेत दिले आणि मग डिसेंबरमध्ये थेट दोघं विवाहबंधनात अडकल्याचीच बातमी आली. आता हीच परंपरा रणवीर-दीपिका पाळण्याची चिन्हं आहेत.
आतापर्यंत दीपिका-रणवीर यांचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा चाहत्यांनी चवीने चघळल्या आहेत. डिसेंबर महिन्यात दोघं बोहल्यावर चढणार असल्याचंही म्हटलं जातं.
काही दिवसांपूर्वी वांद्र्यात दीपिका आईसोबत दागिने खरेदी करताना दिसली होती. त्यामुळे ही लग्नाची खरेदी असल्याच्या चर्चा 'बी टाऊन'मध्ये रंगल्या.
'गोलियों की रासलीला - रामलीला', बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा तीन चित्रपटांमध्ये रणवीर-दीपिकाने एकत्र काम केलं आहे. तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तूफान यश कमावलं आहेच, शिवाय त्यांच्या अभिनयाचंही कौतुक झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement