एक्स्प्लोर

Lalbaugcha Raja : 'लालबागचा राजा'ला एकीकडे व्हीआयपी दर्शनाची रीघ, दुसरीकडे बॉलिवुड कलाकार सर्वसामान्यांच्या रांगेतून दर्शनाला; पाहा व्हिडीओ

Randeep Hooda at Lalbaugcha Raja : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा या सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय.

Randeep Hooda at Lalbaugcha Raja : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमामुळे अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा बराच चर्चेत आला होता. त्याच्या सिनेमाचं अनेक स्तरातून बरंच कौतुकही झालं. त्याचा अभिनय, दिग्दर्शन या सगळ्याचीच दखल घेण्यात आली. पण सध्या एका वेगळ्या कारणामुळे रणदीप हुड्डा चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. तसेच त्याच्यासोबत परिणीती चोप्राही (Parineeti Chopra) बरीच चर्चेत आली आहे. 

सध्या मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असून अनेक प्रसिद्ध गणपती मंडळांमध्ये व्हीआयपींची रीघ लागली आहे. लालबागचा राजाच्या चरणी तर अंबानी कुटुंबापासून अनेक दिग्गज मंडळी लीन झालीत. पण नुकतच या मंडपात एका अभिनेत्रीला मिळालेल्या वागणुकीमुळे बरीच चर्चा झाली. याच सगळ्यात रणदीप हुड्डाने मात्र सगळ्यांचचं लक्ष वेधून घेतलं. 

रणदीपने रांगेत उभं राहून घेतलं दर्शन

दरम्यान लालबागच्या राजाला रणदीप हुड्डा त्याच्या पत्नीसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला होता. पण व्हीआयपी दर्शन न घेता रणदीपने रांगेत उभं राहून दर्शन घेणं पसंत केलं. सोशल मीडियावर सध्या याच व्हिडीओची बरीच चर्चा सुरु आहे. रांगेत उभं असताना अनेकजण त्याच्यासोबत फोटो काढताना दिसले. 

परिणीती चोप्रानेही घेतलं रांगेतून दर्शन

दरम्यान रणदीप लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला असताना त्याच रांगेत परिणीती चोप्रा देखील उभी होती. त्यामुळे परिणीती चोप्रानेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लोकं अनेक तास रांगेत उभे राहतात. त्यातच व्हीआयपी दर्शनामुळे याच रांगा कितीतरी तास खोळंबतात. या सगळ्यात रणदीप आणि परिणीतीच्या या निर्णयाचं सगळ्यांकडून स्वागत केलं जातंय. 

लालबागचा राजाला व्हीआयपींची रिघ

दरम्यान लालबागचा राजाला आतापर्यंत अनेक कलाकारांनी व्हीआयपी दर्शन घेतलं आहे. कार्तिक आर्यन, शिल्पा शेट्टी असे अनेक कलाकार लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले. तसेच अमित शाह, उद्धव ठाकरे या राजकीय नेत्यांनीही राजाचं दर्शन घेतलं. संपूर्ण अंबानी कुटुंबियांनी देखील लालबागचा राजाचं दर्शन घेतलं आहे. इतकचं नव्हे तर अंबानी कुटुंबियांकडून सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

ही बातमी वाचा :

Nikki Tamboli Mother : लेकीला थोबाडीत बसली, आईने सगळ्यांचीच शाळा घेतली; बिग बॉसवरही व्यक्त केली नाराजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVEABP Majha Headlines : 06 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar on Sanjay Gaikwad : मर्यादा पाळा! Ajit Pawar यांनी भर सभेत संजय गायकवाडांना झापलंABP Majha Headlines : 05 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Embed widget