Randeep Hooda: "शुक्र है के भागना नहीं पड़ा"; बायकोच्या वाढदिवसानिमित्त रणदीपची खास पोस्ट
Randeep Hooda: लिन लैशरामच्या वाढदिवसानिमित्तर रणदीपनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा काही दिवसांपूर्वी लिन लैशरामसोबत (Lin Laishram) लग्नबंधनात अडकला आहे. रणदीप आणि लिन यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.आज रणदीपची पत्नी लिनचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तर रणदीपनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
रणदीपची खास पोस्ट (Randeep Hooda)
रणदीप हुड्डाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी लि लिन लैशरामसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये तो लिनसोबत बाईकवर बसलेला दिसत आहे आणि दुसरा फोटो रणदीप आणि लिनच्या लग्नाच्या रिसेप्शनचा आहे. या फोटोला रणदीपनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "शुक्र है के भागना नहीं पड़ा. हायवेपासून ते या वाटेपर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिसेस. मला माहित नव्हते की आयुष्य इतके बदलेल आणि तेही चांगल्यासाठी. तू माझ्या आयुष्यात आहेस. माझ्या आयुष्यात स्थिरता आणि शांतता आणल्याबद्दल मी तुधझे आभारी आहे. तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहिन"
View this post on Instagram
जाणून घ्या लिन लैशरामबद्दल... (Lin Laishram Who Is)
मणिपूर येथील रहिवासी असलेल्या लिन लैशराम ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ओम शांती ओम या चित्रपटात तिनं काम केलं होतं. मेरी कोममध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. रंगून, उमरीका, जाने जान या चित्रपटांमध्येही ती दिसली. याशिवाय लिनने अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत. तिचा स्वत:चा ज्वेलरी ब्रँड देखील आहे.रणदीप आणि लिन यांनी 29 नोव्हेंबर 2023 रोजी लग्न केले.
View this post on Instagram
रणदीपचे चित्रपट
रणदीपनं डरना जरूरी है, बागी-2,रिस्क, हाय वे, साहेब बीवी और गैंगस्टर या चित्रपटांमध्ये रणदीपनं काम केलं आहे. हायवे या चित्रपटातील रणदीपच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
संबंधित बातम्या: