Ranbir Kapoor : 'अॅनिमल' ते 'रामायण', तीन वर्षात रणबीरचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; पाहा हैराण करणारे फोटो
Ranbir Kapoor : अवघ्या तीन वर्षात 'ॲनिमल' ते 'रामायण' या चित्रपटासाठी त्याचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दिसून आले आहे. रणबीरच्या फिटनेस ट्रेनरने त्याचे फोटो शेअर केले आहेत.
Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या चाहत्यांना फिटनेससाठीचे टार्गेट सेट करून देत आहे का, असा प्रश्न निर्माण झाल आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर हा फिटनेससाठी घाम गाळताना दिसला होता. आता, त्याच्या फिजिकल ट्रेनरने त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत. अवघ्या तीन वर्षात 'ॲनिमल' ते 'रामायण' या चित्रपटासाठी त्याचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दिसून आले आहे.
रणबीर कपूरचा फिजिकल ट्रेनर शिवोहम याने इंस्टाग्रामवर रणबीरचे फोटो पोस्ट केले आहेत. पहिला फोटो हा 'ॲनिमल' चित्रपटाच्या दरम्यानचा आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता आणि त्यासाठी रणबीरने खूप वजन वाढवले होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या चित्रात रणबीरचे सिक्स पॅक्स, पिळदार शरीर स्पष्टपणे दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून त्याने घेतलेल्या मेहनतीचा परिणाम यात दिसून आला आहे.
View this post on Instagram
रामाच्या भूमिकेसाठी रणबीर गाळतोय घाम
41 वर्षीय रणबीर कपूर हा 'रामायण' चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या भूमिकेसाठी रणबीर चांगलीच मेहनत घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये स्विमिंग करणे, डोंगर चढणे, सायकल चालवणे, धावणे अशा गोष्टींचा समावेश होता. या व्हिडीओत काही ठिकाणी त्याची पत्नी आलिया आणि लेक राहा दिसली होती.
View this post on Instagram
रणबीर कपूर शेवटचा संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ॲनिमल'मध्ये रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरीसोबत दिसला होता. त्याने रणविजय सिंगची भूमिका साकारली होती. आता तो या 'ॲनिमल पार्क'या 'अॅनिमल'च्या सिक्वेलमध्ये अजीजच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट 2026 मध्ये झळकणार आहे.
'रामायण'मध्ये या कलाकारांची आहे भूमिका
नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये रणबीर हा प्रभू रामाच्या अवतारात दिसणार आहे. अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. भगवान हनुमानासाठी सनी देओलच्या नावाची पुष्टी झाली आहे, मात्र अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कुंभकर्णच्या भूमिकेसाठी बॉबी देओलला विचारणा करण्यात आली आहे. अशीही एक अफवा आहे की विजय सेतुपती रावणाचा भाऊ विभीषणाची भूमिका साकारणार आहे.