एक्स्प्लोर
'बालगंधर्व'च्या रिमेकमध्ये रणबीर कपूर?

मुंबई : 'बँजो'द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव लवकरच्या त्याच्या 'बालगंधर्व' या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याची शक्यता आहे. प्रमुख भूमिकेसाठी रवी जाधवची पहिली पसंती रणबीर कपूरला असल्याचं कळंत. 'बँजो' चित्रपटात रितेश देशमुख आणि नर्गिस फाकरी प्रमुख भूमिकेत आहेत. 23 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र 'बालगंधर्व'चा हिंदी रिमेक बनवणं अतिशय कठीण आहे, कारण हा सिनेमा मराठी संस्कृतीवर केंद्रीत आहे, असं मत रवी जाधवने व्यक्त केलं. पण 'बालगंधर्व'च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत कोण असेल, असं विचारलं असता रवी जाधव पटकन उत्तर दिलं की, रणबीर कपूर! रवी जाधवने आतापर्यंत अर्धा डझनभर सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. नटरंग, बालगंधर्व, बालक-पालक, टाईमपास या सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन त्याने केलं आहे.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















