TJMM : बॉक्स ऑफिसवर रणबीर-श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार'ची गाडी सुसाट; जाणून घ्या तिसऱ्या दिवसांचं कलेक्शन...
TJMM : 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
![TJMM : बॉक्स ऑफिसवर रणबीर-श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार'ची गाडी सुसाट; जाणून घ्या तिसऱ्या दिवसांचं कलेक्शन... Ranbir Kapoor Shraddha Kapoor Tu Jhoothi Main Makkaar box office collection TJMM : बॉक्स ऑफिसवर रणबीर-श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार'ची गाडी सुसाट; जाणून घ्या तिसऱ्या दिवसांचं कलेक्शन...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/11/db5c0e3d82dfcedb2ed6fa81a0d1c9381678524235387254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tu Jhoothi Main Makkaar : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 8 मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे.
'तू झूठी मैं मक्कार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection)
'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.73 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 10.34 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 10.52 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 36.59 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- पहिला दिवस - 15.73 कोटी
- दुसरा दिवस - 10.34 कोटी
- तिसरा दिवस - 10.52 कोटी
- एकूण कमाई - 36.59 कोटी
View this post on Instagram
'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाने वीकेंडला चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) मुख्य भूमिकेत आहेत. रणबीर आणि श्रद्धासह डिंपल कपाडिया, अनुभव सिंह बस्सी आणि बोनी कपूरदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाचं कथानक काय आहे? (Tu Jhoothi Main Makkaar Story)
'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाचं कथानक कौटुंबिक आहे. दिल्लीत राहणारे रणबीर आणि श्रद्धा फिरण्यासाठी स्पेनला जातात. स्पेनमध्ये त्यांची चांगली मैत्री होते आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. कुटुंब आणि प्रेम या दोन्ही सांगड रणबीर-श्रद्धा कशी घालतात हे प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावर कळेल. कौटुंबिक नाट्य असलेल्या या सिनेमाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. लव रंजनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
'तू झूठी मैं मक्कार' ओटीटीवर होणार रिलीज!
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. लवकरच हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. रणबीर-श्रद्धाच्या या सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
संबंधित बातम्या
TJMM Box Office: श्रद्धा आणि रणबीरची बॉक्स ऑफिसवर जादू; 'तू झूठी मैं मक्कार'ने दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)