Ranbir Kapoor : रणबीर कपूरचं हॉलिवूडमध्ये पदार्पण? म्हणाला,"काम करण्याची इच्छा"
Ranbir Kapoor : बॉलिवूडनंतर आता रणबीर कपूर हॉलिवूड गाजवायला सज्ज आहे.
Ranbir Kapoor On Hollywood : बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir kapoor) गेल्या काही दिवसांपासून 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) आणि 'शमशेरा' (Shamshera) या सिनेमांमुळे चर्चेत आहे. 'शमशेरा'च्या माध्यमातून रणबीरने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. तर दुसरीकडे 'ब्रम्हास्त्र' हा सुपरहिट सिनेमा ठरला. नुकतचं 'रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'त (Red Sea International Film Festival) रणबीरने हॉलिवूड पदार्पणासंदर्भात (Ranbir Kapoor On Hollywood) भाष्य केलं आहे.
'रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' रणबीर कपूर चर्चेत होता. या महोत्सवात रणबीरला हॉलिवूड पदार्पणासंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, हॉलिवूड पदार्पणासंदर्भात भाष्य करताना रणबीर म्हणाला,"मी माझ्या भाषेत काम करायला पसंती दर्शवतो. तसेच मला सध्या बॉलिवूडमध्येच चांगल्या संधी मिळत आहेत".
रणबीर पुढे म्हणाला,"बॉलिवूडमध्ये मिळणाऱ्या चांगल्या संधीचा मी स्वीकार करतो. माझी सध्या तरी हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा नाही". हॉलिवूडमध्ये काम करण्याचं रणबीरने स्पष्ट केलं असलं तरी दुसरीकडे मात्र रणबीरची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'द हार्ट ऑफ स्टोन' (The Heart of Stone) हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
रणबीरला व्हायचंय दिग्दर्शक...
रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रणबीर म्हणाला,"मला दिग्दर्शक व्हायचं आहे. तसेच मला लेखकाचं कामदेखील आवडतं. लेखकाचं काम आवडत असलं तरी मी उत्तम संहितालेखक होऊ शकत नाही. सिनेमांची निर्मिती करण्याची माझी इच्छा आहे. पुढच्या दहा वर्षात एक तरी सिनेमाचं मी दिग्दर्शन करू शकतो.
रणबीरचे आगामी सिनेमे
रणबीरचा बहुचर्चित 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच त्याने अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.
संबंधित बातम्या