Ranbir Kapoor Networth : कोट्यवधींचा मालक आहे आलियाचा नवरा; चित्रपटांव्यतिरिक्त रणबीरची कमाई काय?
Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर कोट्यवधी रुपयांचा मालक आहे.
Ranbir Kapoor Income Source : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या सिनेमातील रणबीरच्या कामाचं कौतुक होत आहे. या सिनेमामुळे रणबीर सध्या चर्चेत आहे. रणबीर कपूर हा कोट्यवधींचा मालक आहे.
सावनचा शेअरहोल्डर
रणबीर कपूर हा अभिनयासह वेगवेगळी कामे करतो. 2014 पासून रणबीर कपूर 'सावन' या म्यूझिक स्ट्रीमिंग कंपनीचा शेअरहोल्डर आणि ब्रान्ड अॅम्बेसडर आहे. या म्युझिक कंपनीबद्दल बोलताना रणबीर म्हणाला,"ब्रँडच्या वाढीसाठी मार्गदर्शन करणं, कार्यक्रमांना प्रभावित करणं, तसेच नव्या पिढीला संगीताची ओळख करुन देण्यास मी मदत करेल".
मुंबई सिटी एफसी
41 वर्षीय रणबीर कपूर इंडियन सुपर लीग टीम मुंबई स्टी एफसीचे (Mumbai City FC) मालक आहेत. इंडियन सुपर लीग टीमचाही तो भाग आहे. सिटी फुलबॉल ग्रुपचे (CFG) 65% त्याच्याकडे आहेत. प्रीमियर लीग मैनचेस्टर सिटीचाही तो मालक आहे.
रणबीर कपूर 2022 पासून पुण्यातील ड्रोनआचार्य एरियल इनोवेशनचा भाग आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कंपनीचे अभिनेत्याने 20 लाख रुपयांचे 37,200 शेअर्स विकत घेतले आहेत. मुंबईतील वांद्रे येथील 4-बीएचके अपार्टमेंटसह पुण्यातील ट्रम्प टॉवर्समध्ये अभिनेत्याची 13 कोटी रुपयांची आलिशान अपार्टमेंट आहे. ही अपार्टमेंट अभिनेत्याने भाड्याने दिली आहे.
रणबीर कपूर अनेक जाहिरातींमध्येही काम करतो. लेज, तस्वा, एशियन पेंट्स, लेनोवो, मिंत्रा, पैनासोनिकसह अनेक ब्रँड्सच्या जाहिराती रणबीरने केल्या आहेत. प्रत्येक जाहिरात प्रमोट करण्यासाठी अभिनेता सहा कोटी रुपयांचं मानधन घेतो. रणबीर कपूर वर्षाला 30 कोटी रुपये कमावतो. एका सिनेमासाठी तो 50 कोटी रुपयांचं मानधन घेतो. रणबीर कपूरची एकूण संपत्ती 345 कोटी रुपयांच्या घरात आहे.
रणबीर कपूरबद्दल जाणून घ्या...
रणबीर कपूरने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. 'बर्फी', 'रॉकस्टार', 'संजू', 'ये जवानी है दिवानी', 'राजनीती' अशा अनेक सिनेमांत त्याने काम केलं आहे.
रणबीर कपूरने संजय लीला भन्साळीच्या 'साँवरिया' या सिनेमाच्या माध्यमातून 2007 मध्ये अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या अनेक सिनेमांत त्याने काम केलं आहे. रणबीरला त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2008 मध्ये सर्वोत्तम पुरुष पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने त्याचा सन्मान करण्यात आला.
संबंधित बातम्या