Ramayana : 'रामायण'मधील लंका दहन सीन 'या' देशात होणार शूट; रणबीर कपूर अन् यशने कसली कंबर
Ramayana Shooting : 'रामायण' या सिनेमाचं शूटिंग मुंबईसह लंडनमध्ये होणार आहे. या सिनेमासाठी रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) आता कंबर कसली आहे.
Ramayana : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'रामायण' (Ramayana) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाचं शूटिंग मुंबईसह लंडनमध्ये होणार आहे. या सिनेमासाठी रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) आता कंबर कसली आहे.
'रामायण' या सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), साई पल्लवी (Sai Pallavi) आणि यश (Yash) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या बिग बजेट सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या सिनेमासंदर्भात नवनव्या अपडेट्स समोर येत आहेत. आता या सिनेमाच्या शूटिंगसंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. 'रामायण' या सिनेमाचं शूटिंग लंडन (London) आणि मुंबईसारख्या (Mumbai) शहरांमध्ये होणार आहे. त्यामुळे आता या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
'रामायण' साठी रणबीरने दारू अन् मांसाहार सोडला
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'रामायण' या सिनेमाच्या शूटिंगला रणबीर कपूर लवकरच सुरुवात करणार आहे. शूटिंगचं पहिलं शेड्यूल मुंबईत असणार आहे. रणबीर 60 दिवस मुंबईत शूटिंग करणार आहे. त्यानंतर या सिनेमाची टीम लंडनला रवाना होईल.
लंका दहन सीन 'या' देशात होणार शूट
लंडनमध्ये पुढील 60 दिवस 'रामायण'चं शूटिंग चालेल. तसेच लंडनमध्येच या सिनेमातील लंका दहन सीन शूट होणार आहे. या सिनेमातील अॅक्शन सीनचं शूटिंग लंडनमधील एका स्टुडिओमध्ये होणार आहे. रणबीर कपूर या सिनेमात प्रभू रामाच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्याने दारू आणि मांसाहार सोडला आहे. या सिनेमात रणबीर रामाच्या, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'रामायण'मध्ये सनी देओल हनुमानाची भूमिका वठवणार आहे. या भूमिकेसाठी त्याने 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन घेतलं आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओल खूप उत्सुक आहे. या सिनेमात विजय सेतुपतीची एन्ट्री होऊ शकते, असे म्हटले जात आहे. 'रामायण' हा सिनेमा मार्च 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीरचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे.
संबंधित बातम्या