Raktanchal Season 2 : राजकारण अन् सत्तेची लालसा, 'रक्तांचल'चे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला!
Raktanchal : 'रक्तांचल'चे दुसरे पर्व 11 फेब्रुवारीला एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित झाले आहे.
Raktanchal Season 2 : एमएक्स प्लेयरवर नेहमीच विविध विषयांच्या वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील पडतात. एमएक्स प्लेयरवरील 'रक्तांचल' ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. आता या वेबसीरिजचे दुसरे पर्वदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
'रक्तांचल'चे दुसरे पर्व 11 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन रितम श्रीवास्तव यांनी केले आहे. करण पटेल, माही गिल, क्रांती प्रकाश झा, निकीतीन धीर, आशिष विद्यार्थी हे कलाकार या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
'रक्तांचल' वेबसीरिजची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत. 1980 च्या दशकातील उत्तर प्रदेशात चालणाऱ्या गुन्हेगारीवर आधारित ही वेबसीरिज आहे. 'रक्तांचल'चे दुसरे पर्व राजकारणावर सत्तेने मिळविलेल्या प्रभूत्त्वाची आणि त्यापलीकडील गोष्टींवर भाष्य करणारे आहे.