Rakhi Sawant : राखी सावंतने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार; म्हणाली,"तिहेरी तलाकचा मला फायदा..."
Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने तिहेरी तलाक कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
Rakhi Sawant Video : 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. राखीने तिच्या पतीवर अर्थात आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) मारहाण, फसवणूक आणि लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप केले आहेत. राखी नुकतचं एका मुलाखतीत म्हणाली होती, "मुस्लिम धर्मात चार वेळा लग्न करण्याला परवानगी असल्याने आदिल आता त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे". यादरम्यान राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिहेरी तलाक कायदा (triple talaq law) आणल्याबद्दल त्यांचेदेखील आभार मानले आहेत.
तिहेरी तलाक कायद्याबद्दल राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार (Rakhi Sawant ON Triple Talaq Law)
राखी सावंत म्हणाली, "आदिल मुस्लिम आहे, याचा अर्थ असा नाही की, तो चारवेळा लग्न करेल. आता चौथ्या लग्नासाठी त्याला मुस्लिम धर्मातूनदेखील मान्यता मिळणार नाही. आमच्या लग्नाची कोर्टात नोंदणी झाली आहे. आदिलला मी घटस्फोट देणार नाही. तिहेरी तलाक कायद्यासाठी खरोखरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप-खूप आभार. मला कधी वाटलं नव्हतं की, हा कायदा माझ्या कधी उपयोगी येईल. माझ्यासह अनेक मुस्लिम महिला आम्ही नरेंद्र मोदींचे आभारी आहोत."
View this post on Instagram
तुरुंगातून बाहेर येताच आदिल गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार
राखी सावंत आदिलबद्दल म्हणाली आहे की, "आदिल तुरुंगातून बाहेर येताच गर्लफ्रेंड तनूसोबत लग्न करणार आहे". राखीने 6 फेब्रुवारीला आदिलविरोधात तक्रार (FIR) दाखल केली होती. आदिलने फसवणूक केल्याप्रकरणी राखीने तक्रार दाखल केली होती. राखीच्या तक्रारीची दखल घेत ओशिवरा पोलिसांनी आदिलला अटक केली. राखीने गेल्या वर्षी जुलैमध्ये आदिल दुर्राणीसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं.
बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानीमुळे राखीला गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राखी नुकतीच 'बिग बॉस मराठी 4'च्या (Bigg Boss Marathi 4) प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राखीने प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :