एक्स्प्लोर

Raju Srivastava Health Update: ‘राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा मात्र...’, अभिनेते शेखर सुमन यांनी दिली हेल्थ अपडेट

Raju Srivastava : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे.

Raju Srivastava : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी ट्विट करून राजू श्रीवास्तव यांच्या आरोग्याची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये शेखर यांनी म्हटलेय की, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. देवाची कृपा आणि तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे हे शक्य झाल्याचे शेखर सुमन यांनी म्हटले आहे. राजू यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर असून, त्यांना अद्याप शुद्ध आलेली नाही.

राजू श्रीवास्तव अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत. त्यांच्या मेंदूला आलेली सूज अजूनही कमी झालेली नाही. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्यांच्या प्रकृतीत आता काहीशी सुधारणा होत आहे.

प्रकृतीत सुधारणा, पण...

शेखर सुमन यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये शेखर सुमन यांनी लिहिले की, ‘राजूच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शरीराचे अवयव आता व्यवस्थित काम करू लागले आहेत, तरीही ते  अद्याप बेशुद्ध आहेत. डॉक्टर म्हणाले की, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. बेशुद्ध असले तरीपण त्यांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. हे सर्व महादेवाचे आशीर्वाद आहेत. हर हर महादेव!’

पाहा ट्विट

नेमकं काय झालं?

जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली होती. राजू श्रीवास्तव जिममध्ये कसरत करत होते, तिथे ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यावेळी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हापासून राजू श्रीवास्तव बेशुद्ध असून, अद्याप त्यांना शुद्ध आलेले नाही. कॉमेडियनची प्रकृती चिंताजनक असून, सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान राजू यांची अँजिओग्राफी देखील करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज असल्याचे आढळले होते. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत, यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत.

ते लढवय्ये आहेत!

राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव याआधी राजू यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देत म्हणाल्या होत्या,’राजूजींची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्यांचे काम चोखपणे करत आहेत. राजूजी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण व्यवस्थापन दिवसरात्र काम करत आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. राजूजी हे लढवय्ये आहेत, ते ही लढाई नक्कीच जिंकतील. ते लढतील आणि तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी बरे होऊन परत येतील, हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे. आम्हाला शुभेच्छा, आशीर्वाद मिळत आहेत आणि बरेच लोक त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. मी सर्वांना प्रार्थना करत राहण्याचे आवाहन करू इच्छिते’.

संबंधित बातम्या

Raju Srivastav Health Update : सुनील पालने व्हिडीओ शेअर करत दिली राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती; म्हणाले...

Raju Srivastava Health Update : 'ते लढवय्ये आहेत, ही लढाई ते नक्कीच जिंकतील'; राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीनं दिली माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget