एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'पद्मावती'ला विरोध, राजपूत करनी सेनेचा सुरतमध्ये राडा
यापूर्वीही राजस्थानमध्ये 'पद्मावती'च्या सेटवर जाऊन करनी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता.
सुरत : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला राजपूत करनी सेनेचा विरोध कायम आहे. सुरतमधील राहुल राज मॉलमध्ये काढण्यात आलेली पद्मावतीची रांगोळी पुसून टाकत करनी सेनेने जोरदार गोंधळ केला.
मॉलमधील रांगोळी काढून टाकली आणि मॉलच्या मालकाने माफीही मागितली आहे, असं करनी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. यापूर्वीही राजस्थानमध्ये 'पद्मावती'च्या सेटवर जाऊन करनी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता आणि संजय लीला भन्साळी यांना धक्काबुक्की केली होती.
https://twitter.com/ANI/status/920669805820108802
दरम्यान पद्मावती सिनेमा सध्या आहे तसाच प्रदर्शित झाल्यास आम्हाला विरोध करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा इशारा करनी सेनेने दिला आहे.
पद्मावती चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज होणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु चाहत्यांना आनंदाचा धक्का देत यावर्षीच हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं भन्साळींनी जाहीर केलं आहे. एक डिसेंबर 2017 रोजी पद्मावती सिनेमागृहांमध्ये झळकेल.
‘पद्मावती’त रणवीर सिंगच्या प्रियकराच्या भूमिकेत जिम सर्भ?
पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.
दिल्लीचा शक्तिशाली सुलतान असलेल्या अल्लाउद्दिन खिल्जीचा जीव राणी पद्मावतीवर जडला होता. या प्रेमातूनच त्याने तिच्या राज्यावर हल्लाबोल केला होता. मात्र त्याला शरण जाण्याऐवजी पद्मावतीने देहत्याग करणं पसंत केलं.
आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?
खिल्जी हा बायसेक्शुअल असल्याचं इतिहासाच्या पुस्तकात म्हटलं आहे. मुख्य सल्लागार असलेल्या मलिक काफूरवरही खिल्जीचं प्रेम होतं. गुजरातहून हजारो सुवर्णमुद्रा देऊन खिल्जीने एका तरुणाला विकत घेतलं. हाच तरुण भविष्यात मदुराईवर हल्ला करणारा सेनापती झाला, असं देवदत्त पटनाईकांनी लिहिल्याचं म्हटलं आहे.
दीपिका पदुकोण पद्मावतीची व्यक्तिरेखा साकारत असून शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.
भन्साळी यांचा हा चित्रपट सुरुवातीपासूनच अनेक अडथळ्यांचा सामना करत आहे. आधी भन्साली निर्मात्यांचा शोध घेत होते. यानंतर जयपूरमध्ये शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्साळींना मारहाणही करण्यात आली होती.
संबंधित बातम्या
‘पद्मावती’तील दीपिकाचा फर्स्ट लूक, रीलिज डेटही निश्चित!
‘पद्मावती’त रणवीर सिंगच्या प्रियकराच्या भूमिकेत जिम सर्भ?
बहुप्रतीक्षित ‘पद्मावती’चा लोगो रिलीज, फर्स्ट लूकची उत्सुकता शिगेला!
आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement