Rajkummar Rao Maalik : 'मालिक' राजकुमार रावची पहिली झलक, वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांसाठी खास भेट
Maalik First Look : अभिनेता राजकुमार राव याच्या आगामी मालिक चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे. या चित्रपटात राजकुमार राव गँगस्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
Rajkummar Rao New Movie Maalik : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी, एक हरहुन्नरी कलाकार अभिनेता राजकुमार राव आता एका नव्या रुपात मोठा पडदा गाजवण्यास सज्ज झाला आहे. अभिनेता राजकुमार राव याच्या आगामी चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. राजकुमार राव याच्या 'मालिक' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्याने वाढदिवसाच्या दिवशी इंस्टाग्रामवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना मोठी भेट दिली आहे.
राजकुमार रावच्या वाढदिवसादिवशी नवीन चित्रपटाची घोषणा
अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याचा आज 31 ऑगस्ट रोजी 40 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी राजकुमार रावने चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. राजकुमार रावने त्याच्या आगामी मालिक या चित्रपटाचा फस्ट लूक शेअर करत शूटींग सुरु झाली असल्याची माहिती दिली आहे. राजकुमार रावने चित्रपटातील भूमिकेचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राजकुमार एका जिपवर स्टाईलमध्ये उभा असून त्याच्या हातामध्ये बंदुक दिसत आहे.
'मालिक' राजकुमार रावची पहिली झलक
मालिक (Maalik Movie) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटात राजकुमार राव ॲक्शन करताना दिसणार असल्याचं पोस्टरमधून दिसत आहे. डोळ्यात तळपती आग आणि हातात बंदुक असा राजकुमार रावचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. राजकुमारच्या डोळ्यातील आग पाहता या चित्रपटामध्ये राजकुमारचा वेगळा लूक पाहायला मिळणार आहे, एवढं मात्र नक्की.
वाढदिवसाच्या दिवशी शेअर केलं पोस्टर
View this post on Instagram
चाहत्यांसाठी खास भेट
राजकुमार रावने मालिक चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, "मालिक की दुनिया में आपका स्वागत है. शुटिंग सुरु झाली आहे, लवकरच भेटू". मालिक चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पुलकित यांच्या खांद्यावर आहे. मालिक या ॲक्शन पॅक चित्रपटात राजकुमार रावला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतूर झाले आहे.
राजकुमार रावचा 'स्त्री 2' चित्रपटाचा धमाका
राजकुमार रावचा 'स्त्री 2' चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांची खूप पसंती दिली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 450 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. 'स्त्री 2' चित्रपटात राजकुमार रावसोबत श्रद्धा कपूर, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :