VIDEO : ...जेव्हा थलायवा बिग बींसमोर नतमस्तक होतात; अंबानींच्या शाही सोहळ्यातील भारावून सोडणारा एक क्षण
Anant-Radhika Blessing Ceremony Video : अनंत-राधिकाच्या आशीर्वाद सोहळ्यात रजनीकांत यांनी बिग बींच्या पाया पडले, यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेने चाहत्यांची मने जिंकली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
मुंबई : अनंत-राधिकाच्या लग्नानंतर आता या जोडप्याच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या सोहळ्यामधील एक व्हिडीओ समोर आला आहे. अंबानींच्या कार्यक्रमात थलायवा रजनीकांत बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासमोर नतमस्तक झाल्याचं समोर आलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये साऊथ सुपरस्टार रजनीकांत बिग बी अमिताभ बच्चन यांच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहेत. यानंतर बिग बींनी जे केलं, त्या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
...जेव्हा थलायवा बिग बींसमोर नतमस्तक होतात
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. यानंतर 13 जुलै रोजी या कपलचा 'शुभ आशीर्वाद' सोहळा पार पडला. या सोहळ्याला बी टाऊनमधील अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्याला सेलिब्रटी आणि उद्योगपतींसह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते.
अंबानींच्या शाही सोहळ्यातील भारावून सोडणारा एक क्षण
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही आपल्या संपूर्ण कुटुंबासह या शुभ आशीर्वाद सोहळ्यात हजेरी लावली. या सोहळ्यात त्यांची भेट साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत झाली. बिग बी आणि थलायवा यांच्या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ पाहून चाहते भारावून गेले आहेत.
थलायवा बिग बींच्या पायाला स्पर्श करणारच एवढ्यात...
सोशल मीडियावर या दोन सुपरस्टारच्या भेटीचा अतिशय भारावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सोहळ्यादरम्यान रजनीकांत अभिनेते अमिताभ बच्चन यांना भेटायला येतात आणि खाली वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बिग बी त्यांना थांबवतात. यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर ते एकत्र उभे राहून बोलताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
अंबानींच्या सोहळ्यातील रजनीकांत-अमिताभ यांचा व्हिडीओ
View this post on Instagram
या चित्रपटात अमिताभ-रजनीकांत झळकणार
साऊथ सुपरस्टार रजनीकांत सध्या 73 वर्षांचे आहेत, तर अमिताभ बच्चन 81 वर्षांचे आहेत. रजनीकांत आणि अमिताभ यांनी जवळपास 32 वर्षांपूर्वी 'हम' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं, हा चित्रपट खूप गाजला होता. आता हे दोन्ही सुपरस्टार आगामी 'वेट्टैयान' या चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :