Rajinikanth Discharged: सुपरस्टार रजनीकांत यांना मिळाला डिस्चार्ज, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण
Rajinikanth Discharged: साऊथचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल होते. पण त्यांना आता डिस्चार्ज मिळाला आहे.
Rajinikanth Discharged: साऊथचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये आनंदी आनंद आहे. उद्यापासून सुरू होणारा दिपावलीचा सण रजनीकांत यांना त्यांच्या घरी साजरा करता येणार आहे.
रजनीकांत यांना गुरुवारी चेन्नईतील (Chennai) कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल होण्याच्या चार दिवस आधीच रजनीकांत यांना मानाच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
रजनीकांत यांना चक्कर आल्याने चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांचे 'रुटिन चेकअप' करण्यात आले. त्यानुसार डॉक्टरांनी त्यांना कार्टोइड आर्टरी रिवास्कुलरायजेशन (Cartoid Artery Revascularisation) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. ती शस्त्रक्रियादेखील यशस्वीरित्या पार पडली होती. मेडिकल बुलेटिनमध्येच जाहीर करण्यात आले होते, रजनीकांत यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.
Rajnikant Medical Bulletin : सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर पार पडली शस्त्रक्रिया, मेडिकल बुलेटिन जारी
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी आज रविवारी रजनीकांत यांची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली होती. रजनीकांत यांनी तामिळ सिनेमांत आपला दबदबा कायम ठेवला आहे. दिवाळी निमित्ताने त्यांचा आगामी 'अन्नात्थे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रजनीकांत यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे.
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा..' रजनीकांत यांचा ड्रायव्हर मित्र राज बहादूर, सुपरस्टार होण्याच्या प्रवासात मोलाची साथ, कोण आहेत राज बहादूर
मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर रजनीकांत यांनी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. त्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते रजनीकांत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.