एक्स्प्लोर
'कबाली' पहाटे 4 वाजता रिलीज, तिकीट न मिळाल्याने चाहत्यांचा गोंधळ
चेन्नई: दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतचा बहुप्रतिक्षीत 'कबाली' चित्रपट आज रिलीज झाला आहे. चाहत्यांनी सिनेमाच्या तिकीटासाठी रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु बल्क बुकिंग झाल्यामुळे बऱ्याच चाहत्यांना हा सिनेमा पाहता आला नाही. त्यामुळे संतप्त चाहत्यांनी 'कबाली'ची पोस्टर्स फाडून तसंच तोडफोड करुन रोष व्यक्त केला.
रजनीकांत यांचा 'कबाली' आज देशभरात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेतून हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे.
दक्षिण भारतात रजनीकांत यांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. चेन्नईत या सिनेमाची तिकीटं मिळवण्यासाठी चाहत्यांनी अगदी रात्रीपासून गर्दी केली होती. आज सकाळी 4 वाजताच हा सिनेमा रिलीज करण्यात आला.
कबाली प्रदर्शित होणार म्हणून बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली असून सिनेमाची तिकीटंही वाटली आहेत. परंतु बल्क बुकिंगमुळे बऱ्याच चाहत्यांना तिकीटं मिळू शकली नाहीत.
'कबाली' भारतातील तब्बल 4000 चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार असून त्याची पुढील 3 दिवसांचं बुकिंग हाउसफुल्ल आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व रेकॉर्ड 'कबाली' मोडीत काढेल, असा अंदाजही वर्तवला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement