एक्स्प्लोर

Rajesh Khanna Birth Anniversary : प्रत्येक भूमिकेला न्याय देणारे बॉलिवूडकरांचे 'काका'; सात वर्ष एकीसोबत रिलेशनमध्ये राहिल्यानंतर ट्विंकलच्या आईसोबत थाटला संसार

Rajesh Khanna : राजेश खन्ना यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे.

Rajesh Khanna : बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचं मूळ नाव जतीन खन्ना असलं तरी बॉलिवूडकर त्यांना 'काका' म्हणून हाक मारायचे. त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. 

राजेश खन्ना यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात 180 सिनेमांत काम केलं आहे. यातील 128 सिनेमांत ते मुख्य भूमिकेत झळकले आहेत. त्यांचे सलग 15 सिनेमे गाजले आहेत. 15 सिनेमे गाजवल्यानंतर त्यांना 'बॉलिवूडचा सुपरस्टार' हा किताब मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना तीन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

'आनंद' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन वेळेआधी सेटवर हजर राहायचे. तर राजेश खन्ना मात्र उशीरा सेटवर पोहोचायचे. शूटिंगच्या सेटवर वेळेत येत नसल्याने त्यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले होते. यावर ते म्हणायचे,"क्लार्क कामावर वेळेवर येतात. पण मी क्लार्क नसून कलाकार आहे". 

राजेश खन्ना यांनी मनोरंजनसृष्टीसह राजकारणातही आपलं नशीब आजमावलं आहे. कॉंग्रेसकडून त्यांनी 1991 ते 1996 या काळात दिल्ली लोकसभेसाठी खासदार म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. 

एकीसोबत रिलेशन अन् दुसरीसोबतच लग्न

राजेश खन्ना 1966-72 या काळात फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजू महेंद्रूसोबत रिलेशनमध्ये होते. पाच वर्ष ते अंजूसोबत रिलेशनमध्ये होते. राजेश यांनी लग्नासाठी त्यांना अंजू यांना लग्नासाठी विचारलं होतं. पण आधी करिअर मग लग्न असं कारण अंजू यांनी दिलं. त्यामुळे त्या दोघांत प्रचंड वाद झाले. याच कारणाने त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही. त्यानंतर राजेश खन्ना 1973 साली डिंपल कपाडीयासोबत लग्नबंधनात अडकले. राजेश खन्ना यांच्या लेकीचे नाव ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आहे. राजेश खन्ना आणि त्यांची लेक ट्विंकल दोघांचाही वाढदिवस 29 डिसेंबरलाच असतो. 

राजेश खन्नाचे सुपरहिट 10 सिनेमे ( Rajesh Khanna Polular Films) : 

आराधना (1969) (Aradhana)
दो रास्ते (1969)  (Do Raste)
कटी पतंग (1970) (Kati Patang)
सच्चा झूठा (1970) (Sachaa Jhutha)
हाथी मेरे साथी (1971) (Haathi Mere Saathi)
आनंद (1971) (Anand)
अमर प्रेम (1972) (Amar Prem)
बावर्ची (1972) (Bawarchi)
अजनबी (1974) (Ajanabee)
अवतार (1983) (Avtaar)

राजेश खन्ना यांचा बायोपिक येणार!

दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फराह खान (Farah Khan) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या सिनेमात राजेश खन्ना यांच्या भूमिकेत कोण झळकणार हे अद्याप समोर आलेलं नाही. 

संबंधित बातम्या

सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; फराह खान करणार दिग्दर्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget