एक्स्प्लोर

Raj Thackeray : पहिल्यांदा 'स्वदेस' पाहिला तेव्हा राज ठाकरेंची काय होती प्रतिक्रिया? आशुतोष गोवारीकरांना म्हणाले, 'हा काय सिनेमा....'

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी नुकतच स्वदेश हा चित्रपट पाहिल्यानंतर आशुतोष गोवारीकर यांना काय प्रतिक्रिया दिली होती, यावर भाष्य केलं आहे. 

Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या मनसे (MNS) मेळाव्यात राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्रभरातून त्यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उभे केले जाऊ लागले. बिनशर्त मोदी सरकारला पाठिंबा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात आता मनसे देखील भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पण त्यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सेंटर पॉईंट ठरले. या सगळ्यावर राज ठाकरे यांनी बोल भिडू या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 

दरम्यान राजकारणासाठी राज ठाकरे यांचं नाव जितकं आग्रहाने घेतलं जातं, तितक्याच आग्रहाने त्यांचं सिनेमा आणि कलेवरील प्रेमासाठी देखील घेतलं जातं. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या सिनेमाविषयीच्या प्रेमाचा असाच एक किस्सा सांगितला आहे. राज ठाकरे यांना त्यांच्या यंदाच्या पाडव्याच्या भाषणाविषयची प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या स्वदेस सिनेमाचा संदर्भ दिला. तसेच त्यांनी त्यावेळचा एक प्रसंग देखील सांगितला. 

काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया?

राज ठाकरेंनी म्हटलं की,  'मी स्वदेस पाहायला गेलो होतो. आशुतोष गोवारीकर यांनी आमच्यासाठी त्या सिनेमाचा प्रिव्ह्यु ठेवला होता. इंटरवल बाहेर आलो, आशुकडे पाहिलं पुन्हा आत गेलो. सिनेमा पाहून झाल्यानंतर त्याला म्हटलं की, अरे हे काय केलंयस. मला तेव्हा अजिबात सिनेमा आवडला नाही. त्याला म्हटलं हा काय सिनेमा आहे का, असं काहीतरी बोललं मी त्याला. आजही त्यासाठी मला वाईट वाटतं. पण मी घरी आल्यानंतर शांतपणे विचार केला की, मी सिनेमा पाहिला का? कारण तेव्हा माझ्या बॅक ऑफ द माईंड लगान होता. मी तिथे माझा एक स्वत:चा डोक्यात एक सिनेमा घेऊन गेलो होतो. पण तसं काहीच मला दिसलं नाही. तेव्हा मला कळलं की मी सिनेमाचं नाही पाहिला.' 

दुसऱ्यांदा थिएटर बूक करुन सिनेमा पाहिला - राज ठाकरे

पुढे त्यांनी म्हटलं की, 'एक छोटं थिएटर बूक केलं आणि एकट्याने स्वदेस पाहिला. ज्यावेळी तो ट्रेनचा सिन आहे, तो गावात जाऊन येतो आणि पहिल्यांदा त्या मुलाकडून पाणी पितो, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिथूनच आशुतोषला मेसेज केला. मी त्याला म्हटलं, की सॉरी, मी त्या दिवशी सिनेमा पाहू शकलो नाही. आता पाहिला, अप्रतिम सिनेमा आहे. मी थिएटरचा दरवाजा उघडून बाहेर आलो, सोफ्यावर आशुतोष बसला होता. त्याला कुणीतरी सांगितलं की, मी सिनेमा पाहतोय.'  

ही बातमी वाचा : 

Amitabh Bachchan : 'बिग बीं'कडून शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक, देवेंद्र फडणवीसांनी फिल्मी स्टाईल मानले अमिताभ यांचे आभार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: नायगावमध्ये प्रेयसीने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, प्रियकराने आयुष्य संपवलं, मग तिनेही.... प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
प्रेयसीचा लिव्ह इनमध्ये राहायला नकार, प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा :01 April 2025 : 7 AMABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07 AM 01 April 2025Top 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 01 April 2025 : ABP MajhaOld Currency Special Report : जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये 101कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडूनच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: नायगावमध्ये प्रेयसीने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, प्रियकराने आयुष्य संपवलं, मग तिनेही.... प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
प्रेयसीचा लिव्ह इनमध्ये राहायला नकार, प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Embed widget