एक्स्प्लोर

Amitabh Bachchan : 'बिग बीं'कडून शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक, देवेंद्र फडणवीसांनी फिल्मी स्टाईल मानले अमिताभ यांचे आभार

Amitabh Bachchan :  अमिताभ बच्चन यांनी नुकतच मुंबई कोस्टल रोडवरुन प्रवास केला.त्यांनी त्यांच्या या प्रवासाचा अनुभव त्यांच्या ट्विटरवरुन शेअर केलाय. 

Amitabh Bachchan :  बहुप्रतिक्षित असलेल्या मुंबई कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) पहिल्या दहा किमी अंतराचं उद्घाटन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यामुळे मुंबईला पश्चिम उपनगराला जोडणं शक्य झालं आहे. अनेकजण या कोस्टल रोडवरुन प्रवास करतानाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातच आता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील नुकतच कोस्टल रोडवरुन प्रवास करत त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचं देखील कौतुक केलं आहे. तर त्यांच्या या ट्विटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अगदी फिल्मी स्टाईल रिप्लाय दिलाय. 

मुंबई ते कांदिवली असा या कोस्टल रोडचा प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च हा  12,721 कोटी रुपये आहे. नुकतच लोकार्पण झालेल्या अटल सेतूवरही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर आता कोस्टल रोडच्या कामाचं देखील कौतुक होत असल्याचं पाहायला मिळतंय. 

अमिताभ बच्चन यांनी काय म्हटलं?

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत या कोस्टल रोडचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'T 4999 - Oh ! Boy !! went to work .. after Sea Link on to Coastal Road and Tunnel underground .. JVPD, Juhu to Marine Drive , 30 mins .. !! वाह ! क्या बात है  ! साफ़ सुथरी  नयी बढ़िया सड़क, कोई रुकावट नहीं ' पण अमिताभ यांच्या ट्विटपेक्षा यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी फिल्मीस्टाईलमध्ये अमिताभ यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं की, “Parampara, Pratishtha, Anushasan, Ye iss sarkar ke teen stambh hai !" e wo aadarsh hain jinse hum Bharatiyon ka kal banaate hai”..., अमिताभ जी तुम्ही तुमच्या प्रवासाचा अनुभव शेअर केलात, त्याबद्दल खूप आभार. मुंबई आता अपग्रेड होतेय आणि आम्ही मुंबईकरांसाठी वेळ वाचवणाऱ्या प्रवासाचा अनुभव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. 

ही बातमी वाचा :

Chinmay Mandlekar : 'रजनीकांत'सोबत पहिली भेट अन् त्यांनी मराठीत केलेलं संभाषण, चिन्मय मांडलेकरने सांगितला आयुष्यातला 'सुपरस्टार' किस्सा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला ⁠सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारणMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | Superfast News | 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Embed widget