एक्स्प्लोर
Advertisement
REVIEW : रेड
टिपिकल अॅग्री यंग मॅन अजय बघायचा असेल तर मात्र तुमचा हट्ट हा सिनेमा पुरवतो.
गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाबद्दल उत्सुकता होती. कारण राजकुमार गुप्ता या दिग्दर्शकाचा हा सिनेमा आहे. आमीर, नो वन किल्ड जेसिका यासारखे सिनेमे त्यांनी दिले. एकूण सिनेमा या माध्यमाकडे खूप गांभीर्याने पाहणारा हा दिग्दर्शक आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंदी सिनेमा अनेक महत्वाचे विषय हाताळू लागला आहे. स्पेशल 26, बेबी ही त्याची उदाहरणं. रेडचा ट्रेलर पाहून असंच काहीतरी धक्कादायक पाहायला मिळणार की काय असं वाटत राहतं. असे धक्के देण्यात हा सिनेमा यशस्वी ठरतो. मुळात छापा कसा टाकतात हेच सामान्य लोकांना माहीत नसतं. कारण आयकर विभाग आणि छापेबाज सामान्य माणसांना कधीच असा त्रास देत नाहीत. म्हणून ही गोष्ट बघणेबल होते.
गोष्ट सोपी आहे. अमय पटनायक हा कर्तव्यदक्ष आयकर विभागाचा निरीक्षक आहे. सात वर्षात 49 वेळा त्याची बदली झाली आहे. केवळ देशसेवा हे ब्रीद उराशी बाळगून तो काम करतो. त्याची पत्नी त्याला साथ देते आहे. तर आता त्याची बदली झाली आहे लखनौमध्ये. तिथे काम करताना त्याच्या लक्षात येतं की तिथले खासदार रामेश्वर यांच्याकडे 420 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आहे. तशी खात्रीलायक टीप त्याला मिळते. त्यातून मग हे छापासत्र सुरु होतं. यातली गंमत अशी की हा सिनेमा बनवताना त्याचा काळ 1980 चा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या सिनेमात मोबाईल, इंटरनेट नाही. म्हणून त्याचा थरार वाढतो. गुप्ता यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाने सर्वच कलाकारांकडून काम चांगलं काढून घेतलं आहे. सर्व तांत्रिक बाबींमध्ये हा सिनेमा चोख झाला आहे. हा सिनेमा मनोरंजन करतो. मजा आणतो. आणि मग त्या खासदाराकडे खजिना सापडणार हे तर ओघाने आलं. तो खजिना बघणंही चकित करणारं आहे.
अमित त्रिवेदी आणि तनिश्क बागची ही जोडीनं सिनेमाला संगीत दिलं आहे. राहत फतेह अली खान यांचं गाणं श्रवणीय आहे. आता या कथेतला नायक अमय पटनायक अर्थात अजय देवगण असल्यामुळे ही संपूर्ण कथा त्याच्याभोवती फिरते. अजय देवगणला पडद्यावर पाहायला मजा येते. पण त्याचा अमय बघताना गंगाजलमधला अमित आणि सिंघममधला बाजीराव दिसत राहतो. खरंतर पोलिस आणि आयकर आॅफिसर यात फरक असतो. तो जर इथे दाखवला असता तर जास्त गंमत आली असती. पण टिपिकल अॅग्री यंग मॅन अजय बघायचा असेल तर मात्र तुमचा हट्ट हा सिनेमा पुरवतो. सौरभ शुक्ला यांनी रामेश्वर यांची भूमिका केली आहे. कोणताही आव न आणता सहजी केलेला अभिनय ही त्यांची खासियत. त्यांना पडद्यावर पाहताना मजा येते. शिवाय चित्रपटातील सर्वच व्यक्तिरेखा योग्य साकारण्यात आल्या आहेत.
ओव्हरआॅल रेड हा नेटका सिनेमा आहे. वीकेंडला थिएटरमध्ये जायचं असेल तर तो एक चांगला पर्याय ठरु शकतो. पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाने मिळवलेलं आहे लाईक.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement