Rahul Vaidya Birthday : आईच्या हट्टामुळे मिळाली करियरला दिशा, रिॲलिटी शोमुळे एका रात्रीत बनला स्टार
Happy Birthday Rahul Vaidya : राहुल वैद्य रिॲलिटी शोमुळे रातोरात प्रसिद्ध झाला. त्यानंतर तो बिग बॉस आणि खतरों के खिलाडी मालिकेमध्येही दिसला.
Rahul Vaidya Unknown Facts : आज 23 सप्टेंबर रोजी गायक राहुल वैद्य याचा वाढदिवस आहे. राहुल वैद्य रिॲलिटी शोमुळे रातोरात प्रसिद्ध झाला. त्यानंतर तो बिग बॉस आणि खतरों के खिलाडी मालिकेमध्येही दिसला होता. आईच्या इच्छेमुळे तो संगीत शिकला. आईच्याच हट्टामुळेचे त्याच्या करियरला नवी दिशा मिळाली. आज हा गायक कोट्यवधींचा मालक आहे. आज राहुल वैद्यच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल जाणून घ्या.
हॅप्पी बर्थडे राहुल वैद्य
गायक राहुल वैद्य याचा जन्म 23 सप्टेंबर 1987 रोजी मुंबईत झाला. राहुल वैद्यचे वडील कृष्ण वैद्य इंजिनीयर आणि आई गीता वैद्य गृहिणी यांच्या पोटी जन्मलेल्या राहुलला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. एकदा तो गात असताना त्याच्या आईला त्याच्यातील संगीत गुणाची झलक दिसली आणि तिने राहुलला संगीतावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. आईच्या इच्छेमुळे राहुलने लहानपणापासून संगीताचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.
आईच्या सल्ल्याने झाली करिअरला सुरुवात
राहुलने संगीतामध्ये काहीतरी करावं, अशी त्याच्या आईची इच्छा होती. आईच्या सल्ल्यानुसारच राहुल वैद्यने संगीताची निवड करिअर म्हणून करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या शिक्षणासह संगीत प्रशिक्षण घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याच्या गायक होण्यामागे त्याच्या आईची सर्वात मोठी भूमिका असल्याचे त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
रिॲलिटी शोमुळे रातोरात स्टार
राहुल वैद्य अनेक रिॲलिटी शोमध्ये दिसला आहे. 2004 मध्ये राहुल वैद्य टीव्ही शो इंडियन आयडॉलचा भाग बनला होता. या शोमुळे राहुल वैद्य रातोरात लोकप्रिय झाला. राहुल वैद्यच्या गायकीने सर्वांना वेड लावलं. इंडियन आयडॉल शोमध्ये तो टॉप 3 स्पर्धकांमध्ये आपलं स्थान बनविण्यात यशस्वी झाला.
या टीव्ही शोमध्ये झळकला
इंडियन आयडॉल शोनंतर राहुल वैद्य जो जीता वही सुपरस्टार, आजा माही वे, झलक दिखला जा, म्युझिक का महा मुकाबला, बिग बॉस 14 सारख्या शोमध्ये दिसला आहे. राहुल वैद्य यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत.
बॉलिवूड चित्रपटातील पहिलं गाणं कोणतं?
राहुल वैद्यने 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'शादी नंबर 1' या चित्रपटात गाणे गाऊन बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी 'हॅलो मॅडम' हे गाणं गायलं आहे. यानंतर त्याने जान-ए-मन आणि क्रेझी 4 सारखे चित्रपटांती गाण्यांना आवाज दिला. राहुलने फक्त चित्रपटांमध्येच नाही तर म्युझिक अल्बममध्येही आपल्या आवाजाची जादू पसरवली आहे. राहुल वैद्यने 2021 मध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिशा परमारसोबत लग्न केलं. या कपलला एक वर्षांची मुलगी आहे. नुकताच तिचा पहिला वाढदिवस झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :