Radhe Trailer: चित्रपटाच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच सलमान खान हिरोईनच्या ओठांवर KISS करताना दिसला
Radhe: Your Most Wanted Bhai trailer: सलमान खानची बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये दिशा पटांनी त्याची साथ देत आहे. ट्रेलरमध्ये दिशा आणि सलमान किस करताना दिसत आहेत.
![Radhe Trailer: चित्रपटाच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच सलमान खान हिरोईनच्या ओठांवर KISS करताना दिसला Radhe: Your Most Wanted Bhai trailer: Salman Khan shares his first on-screen kiss with Disha Patani, fans go wild on Social Media Radhe Trailer: चित्रपटाच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच सलमान खान हिरोईनच्या ओठांवर KISS करताना दिसला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/22/0a01d044722974c670b79ff5c48b45b1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सलमान खान पहिल्यांदा पडद्यावर नायिकेला किस करताना दिसला. हे पाहून त्याचे चाहते क्रेझी झाले आहेत. त्याच्या राधे या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून चर्चेत असलेल्या अभिनेत्री दिशा पटाणीसोबत त्याचा एक किसिंग सीन आहे.
सलमानच्या चाहत्यांना आवडणारं सर्वकाही राधेच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. यात अॅक्शन, रोमान्स, हिट संवाद आहेत. पण यात सलमान खानचा किसिंग सीन असेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. हे दृश्य पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.
ट्विटरवर ट्रेलर पाहून प्रतिक्रिया काय आहेत?
त्याच्या एका चाहत्याने तो फोटो शेअर केला आणि लिहिलंय.. आजपर्यंत मी इतका आनंदित कधीच नव्हतो.
Itni khushi muje aaj tak bhi hui finally kiss is here 🔥#RadheTrailer #Radhe #SalmanKhan #Dishapatani pic.twitter.com/uu9fjcZkli
— Being ABD (@being_Sk_alia) April 22, 2021
Wait did I see Salman kiss Disha in #RadheTrailer 😲
— 𝑹𝒖𝒑𝒂𝒍𝒊⭐💫 (@KrazyGal92) April 22, 2021
#RadheTrailer @BeingSalmanKhan Ne kiss kardi Aakhir me 😂😂 😆 @DishPatani pic.twitter.com/HgD3oO1khn
— saqlain Belim (@SuzainVhora) April 22, 2021
सलमान आपल्या चित्रपट कारकिर्दीत प्रथमच किस करताना दिसला आहे. काही लोकांना हे पाहिल्यावरही विश्वास बसत नाही.
ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर सलमान खान यात एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. यात तो आपल्या शहरातील गुन्हेगारी नष्ट करताना दिसत आहे. या चित्रपटात सलमान राधे या मुख्य भूमिकेत असून त्याने आतापर्यंत 97 एनकाउंटर केले आहेत. यात राधेच्या प्रेमात पडलेल्या जॅकी श्रॉफच्या बहिणीच्या भूमिका दिशाने साकारली आहे.
हा चित्रपट गेल्या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. पण, कोरोना साथीमुळे पुढे ढकलला गेला. यावर्षीसुद्धा रिलीजची तारीख कित्येक वेळा पुढे केल्याच्या बातम्या आल्या आहेत. पण आता सलमान खान फिल्म्सने हा निर्णय घेतला आहे की हा चित्रपट 13 मे रोजी थिएटर तसेच मल्टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)