एक्स्प्लोर

Pushpa 2 : पुष्पा 2 चा क्लायमॅक्स सीन लीक, फॅन्स संतापले; व्हिडीओ डिलिट करण्याची मागणी

Pushpa The Rule : पुष्पा चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या शूटिंगचा व्हिडीओ लीक झाल्याचं सांगितलं जात आहे. आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहते चिंतेत आहेत.

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा (Pushpa Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun), रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा' 2021 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. चित्रपटासह गाण्यांचीही क्रेझ पाहायला मिळाली होती. यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली. चाहते आतुरतेने चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

पुष्पा चित्रपटाच्या सीक्वेलची चाहत्यांना प्रतीक्षा

पुष्पा : द रुल या सीक्वेलमधील अल्लू अर्जूनचा फर्स्ट लूक याआधी समोर आला आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण, चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनला उशीर झाल्यामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 2024 च्या अखेरीस  प्रदर्शित करण्यात येणार आहे. दरम्यान, आता चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ पुष्पा 2 चित्रपटाच्या क्लायमॅक्स शूटिंग लीक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे.

पुष्पा 2 चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन लीक

क्लायमॅक्स लीक झाल्याने चाहते संतापले

'पुष्पा 2' या चित्रपट दिग्दर्शक सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असून शूटिंगचा व्हिडीओ लीक झाल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये टीम चित्रपटाच्या फाईट सीनचे शूटिंग करत असल्याचं दिसून येते. व्हायरल व्हिडीओमध्ये रक्ताने माखलेला माणूस हार्नेसला लटकताना दिसत असून एक जेसीबीही दिसत आहे. काही लोक सेटअपमध्ये मदत करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये चित्रपटाचे मुख्य कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना दिसत नाहीत, मात्र, हा चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या शूटिंगच्या वेळेच्या असल्याचं सांगितलं जात आहे. आता हा व्हिडीओ  समोर आल्यानंतर चाहते चिंतेत आहेत. चाहते हा व्हिडीओ हटवण्याची मागणी करत आहे.

'क्लायमॅक्स खराब करू नका'

'पुष्पा 2' चित्रपटाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. या क्लायमॅक्स सीनमुळे चाहते प्रचंड संतापले आहेत. एकाने लिहिलं, 'डिलीट करा.' दुसऱ्यानं लिहिलं की, 'कृपया व्हिडीओ हटवा.' आमच्यासाठी क्लायमॅक्स खराब करू नका.' यासोबतच आणखी एकानं लिहिलं की, 'असे महत्त्वाचे सीन्स लीक करणे म्हणजे निर्मात्यांवर अन्याय आहे.'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nikki Tamboli : "तंगड्या वर करुन कॅमेऱ्यासमोर झोपते", निक्कीकडून वर्षा उसगांवकरांचा अपमान; रितेश काय भूमिका घेणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दीAmaravati Textiles Park :उद्या अमरावती टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन, मोदींच्या हस्ते उद्या ई-भूमिपूजनRatnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकारMNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget