एक्स्प्लोर
सलमानच्या 'टायगर जिंदा है'चे पोस्टर जाळले
वाल्मिकी समाजावर आक्षेपार्ह टिपण्णी केल्यामुळे राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सिनेमाला विरोध करण्यात येत आहे.
जयपूर : अभिनेता सलमान खानचा 'टायगर जिंदा है' सिनेमा रिलीज झाला आहे. मात्र सलमानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वाल्मिकी समाजावर आक्षेपार्ह टिपण्णी केल्यामुळे राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सिनेमाला विरोध करण्यात येत आहे.
सिनेमागृहाबाहेर 'टायगर जिंदा है'चे पोस्टर्सही जाळण्यात आले आणि घोषणाबाजी करण्यात आली. वाल्मिकी समाजाने शिल्पा शेट्टी आणि सलमानविरोधात एफआयआर दाखल केला होता. एफआयआर दाखल केल्यानंतर आता सिनेमाला विरोधही होत आहे.
राज्यातही 'देवा' या मराठी सिनेमाला ‘टायगर जिंदा है’मुळे स्क्रीन मिळत नव्हत्या. त्यामुळे यशराजविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. राज्यातील वाद मिटला आहे. पण आता राजस्थानमध्ये सिनेमाला विरोध होत आहे. राज्यात देवा सिनेमाला 225 स्क्रीन्स देण्यात आल्या आहेत.
https://twitter.com/ANI/status/944058204941533184
नेमका वाद काय आहे?
‘टायगर जिंदा है’च्या प्रमोशनदरम्यान सलमान खानने त्याचं डान्स टॅलेंट सांगताना जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. शिल्पा शेट्टीनेही ती घरी कशी दिसते, ते सांगण्यासाठी याच शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर वाल्मिकी समाजाने एफआयआर दाखल केला. एफआयआरची कॉपी फेसबुकवरही शेअर करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सलमानविरोधात दाखल झालेल्या तक्रारींवरुन आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालय, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून सात दिवसांच्या आत उत्तर मागितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement