एक्स्प्लोर

'Poject K' नव्हे 'Kalki 2898 AD'; वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा प्रभासच्या आगामी सिनेमाचा टीझर

Project K Teaser And Title Out : प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' या सिनेमाचं नाव आता 'कल्की 2898 AD' असं ठेवण्यात आलं आहे.

Prabhas Project K Title And Teaser Released : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'प्रोजेक्ट के' (Project K) या सिनेमाचं नाव आता बदलण्यात आलं असून 'कल्की 2898 AD' (Kalki 2898 AD) असे ठेवण्यात आले आहे. नाव जाहीर करण्यासोबत या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'कल्की 2898 AD'चा (Kalki 2898 AD) टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. टीझरमध्ये प्रभासचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. सिनेमातील दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) लूकही पाहण्यासारखा आहे. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. 'कल्की 2898 AD'चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वैजयंती मूव्हीजने 'कल्की 2898 AD'चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.  अल्पावधीतच या टीझरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. टीझर पाहताच प्रेक्षकांनी सिनेमा ब्लॉकबस्टर होणार हे जाहीर केलं आहे. टीझरला लाईक्स आणि कमेंट्स करत ते आपली पसंती दर्शवत आहेत. टीझरमध्ये अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांचा फर्स्ट लूक दमदार दिसत असतानाच प्रभासनेही दमदार एन्ट्री केली. प्रोजेक्ट के आता कल्की 2898 एडी, असं म्हणत प्रभासनेही टीझर शेअर केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Vyjayanthi Movies (@vyjayanthimovies)

 'कल्की 2898 AD'चा टीझर पाहून या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन आणि रहस्य पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रभासचा पहिल्यांदाच एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. 12 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे.

तगडी स्टारकास्ट असलेला 'कल्की 2898 AD' (Kalki 2898 AD Starcast)

''कल्की 2898 AD' या सिनेमात प्रभास (Prabhas) आणि दीपिका पादुकोणसह (Deepika Padukone) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), कमल हासन (Kamal Haasan) आणि दिशा पटानी (Disha Patani) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कमल हासन या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.  नाग अश्विनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

संबंधित बातम्या

Project K : 'प्रोजेक्ट के' सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक आऊट; चाहते म्हणाले,"सुपरस्टारचा सिनेमा सुपरहिट होणार"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDaryapur Rada : दर्यापुरात राडा करणाऱ्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक करा -नवनीत राणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget