एक्स्प्लोर
प्रियांका-निकचे आज दिल्लीत रिसेप्शन, पंतप्रधान मोदी लावणार उपस्थिती
प्रियांका-निक दिल्लीत दाखल झाले आहेत. या रिसेप्शनला काही खास पाहुणेच उपस्थित राहणार आहेत. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
![प्रियांका-निकचे आज दिल्लीत रिसेप्शन, पंतप्रधान मोदी लावणार उपस्थिती Priyanka-Nik's reception in Delhi today, Prime Minister Modi will attend प्रियांका-निकचे आज दिल्लीत रिसेप्शन, पंतप्रधान मोदी लावणार उपस्थिती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/04140206/priyanka-jonas.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे आज त्यांच्या खास पाहुण्यांसाठी दिल्लीत ग्रँड रिसेप्शन देणार आहेत. त्यासाठी प्रियांका-निक दिल्लीत दाखल झाले आहेत. या रिसेप्शनला काही खास पाहुणेच उपस्थित राहणार आहेत. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
लग्नापूर्वी निक न्यूयॉर्कहून थेट दिल्लीत पोहोचला होता. त्यावेळी प्रियांकाही तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी दिल्लीत होती. त्यावेळी या दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना रिसेप्शनचे आमंत्रण दिले होते, अशी माहिती मिळत आहे.
नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील मोठी मंडळी या रिसेप्शन उपस्थित राहणार आहे. त्यात उद्योजक मुकेश अंबानी हे सुद्धा रिसेप्शनला उपस्थित राहतील. प्रियांका-निकच्या संगीताच्या कार्यक्रमाला मुकेश अंबानींनी आपल्या कुटुंबियासोबत हजेरी लावली होती.
नुकतेच प्रियांका आणि निकचे जोधपूर येथे 1 डिसेंबर रोजी कॅथलिक पद्धतीने तर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह सोहळा पार पडला होता. त्यात बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)