एक्स्प्लोर
'बेवॉच'च्या सेटवर प्रियंका चोप्रा जखमी

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिचा आगामी हॉलिवूडपट 'बेवॉच'च्या सेटवर जखमी झाल्याची माहिती आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन प्रियंकाने त्याबाबत संकेत दिले आहेत. पहिल्या फोटोमध्ये प्रियंकाने फर्स्ट एड किट आणि काही औषधं दाखवली आहेत. कामावर असताना झालेल्या दुखापतींचा उपचार, असं कॅप्शन त्याने दिलं आहे.
'बेवॉच' चित्रपटात प्रियंका व्हिक्टोरिया ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रियंकासोबत ड्वेन जॉनसन, जॅक एरॉन, जॉन बास, केली रोहरबॅच, अलेक्झांड्रा डाडारियो यासारखे हॉलिवूडचे सुप्रसिद्ध कलाकारही दिसणार आहेत. 90 च्या दशकात हिट झालेल्या 'बेवॉच' या टीव्ही सीरिजवर हा चित्रपट आधारित आहे. गेल्या काही महिन्यांपासून याचं शूटिंग सुरु असून प्रियंकासोबतच तिचे चाहतेही हॉलिवूड पदार्पणाबाबत उत्सुक आहेत.
All smoke and mirrors... #Baywatch #nightshoots #Savannah A photo posted by Priyanka Chopra (@priyankachopra) on
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























