एक्स्प्लोर

फौजदारी खटल्यांविरोधात प्रिया प्रकाश सुप्रीम कोर्टात

'मनिक्या मलारया पूवी' या गाण्यावरुन निर्माण झालेला वाद निरर्थक असल्याचं प्रिया प्रकाश आणि दिग्दर्शकाने याचिकेत म्हटलं आहे.

नवी दिल्ली : इंटरनेट सेन्सेशन ठरलेली मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. हैदराबाद आणि मुंबईत आपल्याविरोधात दाखल केलेले फौजदारी खटले रद्द करण्याची मागणी प्रियाने केली आहे. 'ओरु अदार लव्ह' या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक ओमर अब्दुल वहाब यांनीही प्रियासोबत याचिका दाखल केली आहे. 'मनिक्या मलारया पूवी' या गाण्यावरुन निर्माण झालेला वाद निरर्थक असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. याचिकेत काय म्हटलंय? 'मनिक्या मलारया पूवी' हे मालाबार क्षेत्रातील मुस्लिम समाजाचं हे लोकगीत आहे. पैगंबर मोहम्मद आणि त्यांच्या पत्नी खदीजा यांच्यातील प्रेमाची त्याच तारीफ करण्यात आली आहे. 1978 मध्ये कवी पीएमए जब्बार यांनी हे गाणं लिहिलं होतं. गेली 40 वर्ष केरळमधील मुसलमान हे गाणं आनंदाने गात आहेत. अमल्ल्याळम भाषिकांनी निष्कारण वाद निर्माण केला आहे. गाण्यातून चुकीचा अर्थ काढून केस दाखल केली आहे, असं याचिकेत म्हटलं आहे. प्रिया आणि ओमर यांनी आपल्या मूलभूत अधिकारांचाही उल्लेख याचिकेत केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिला आहे. चित्रपटातील गाण्याचा चुकीचा अनुवाद करुन याचिकाकर्त्यांनी आपल्या अधिकारांचा अवमान केला आहे, असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. चित्रपटाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. दीड कोटी रुपये या सिनेमावर खर्च झाले आहेत. अमल्ल्याळम भाषिक व्यक्ती इतर राज्यांतही अशाप्रकारचे खटले दाखल करण्याची भीती आहे. त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या आणि पुढे दाखल होणाऱ्या खटल्यांपासून याचिकाकर्त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. औरंगाबादेतील जिन्सी पोलिस ठाण्यात जनजागरण समिती महाराष्ट्र संघटनेने तक्रार दाखल केली होती. 'मनिक्या मलारया पूवी' गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यावर इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं आढळलं, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तर हैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियरविरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली होती.

संबंधित बातम्या :

प्रिया... माझ्या वेळी कुठे होतीस? : ऋषी कपूर

Exclusive : रातोरात लोकप्रिय झाल्याने घराबाहेर जाणंही बंद झालं : प्रिया प्रकाश

प्रिया वारियर, दिग्दर्शकाविरोधात औरंगाबादमध्ये पोलिस तक्रार

‘या’ क्रिकेटरची प्रिया वारियर मोठी फॅन

इंटरनेट सेन्सेशन प्रियाविरोधात भावना दुखावल्याची तक्रार

आधी डोळे, आता गन शॉट, प्रिया वॉरियरचा नवा व्हिडीओ

‘नॅशनल क्रश’ प्रिया वॉरियरचा व्हॅलेंटाईन प्लॅन काय? जाणून घ्या

प्रिया वारियरने कतरीनासह सनी लिओनलाही मागे टाकलं!

डोळा मारणारी ‘व्हायरल गर्ल’ प्रिया आहे तरी कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget