Deepika Padukone : मुंबईच्या गर्मीने 'मॉम टू बी' दीपिका हैराण;म्हणाली,"AC ऑन करते तर थंडी वाजते..."
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण मुंबईच्या गर्मीने हैराण झाली आहे. प्रेग्नंट दीपिकाला मुंबईच्या गर्मीचा खूप त्रास होत आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे.
![Deepika Padukone : मुंबईच्या गर्मीने 'मॉम टू बी' दीपिका हैराण;म्हणाली, Pregnant Deepika Padukone Constant Vattle With AC in This Scorching Heat is Each One of Us Mumbai Actress Shared post on Social Media Know bollywood entertainment Latest Update Deepika Padukone : मुंबईच्या गर्मीने 'मॉम टू बी' दीपिका हैराण;म्हणाली,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/ed2a46fb4057b96b3309395721d8d56f1716348741885254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या प्रेग्नंसीमुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकताच मतदानाचा (Lok Sabha Election 2024) हक्क बजावला. प्रेग्नंसीचा दीपिकाचा पाचवा महिना सुरू असून मतदान केंद्रावर दीपिका पोहोचली तेव्हा तिचे बेबी बंप दिसून आले. त्यावेळी रणवीर सिंह (Ranveer Singh) आपल्या प्रेग्नंट पत्नीची काळजी घेताना दिसून आला. अभिनेत्रीने आता आपल्या प्रेग्नंसी पोस्टसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या गर्मीच्या दिवसांत अभिनेत्री AC ऑन करते तेव्हा तिला थंडे वाजते. तर Ac बंद केला तर तिला गरम होतं. प्रेग्नंसीदरम्यान अनेक महिलांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दीपिका पादुकोणही मुंबईतील गर्मीने हैराण झाली आहे.
प्रेग्नंट दीपिका पादुकोण हौराण
मुंबईतील गर्मीने दीपिका पादुकोण चांगलीच हैराण झाल आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने प्रेग्नंसीमध्ये आपल्याला येत असलेल्या समस्येवर भाष्य केलं आहे. दीपिका पादुकोणने लिहिलं आहे,"मी AC ऑन केल्यावर दोन मिनिटांतच मला थंडी वाजायला सुरुवात होते. पण ऑफ केल्यावर मला गरम होतं. या अडचणीमध्ये मी फसले आहे". एकंदरीतच मुंबईतल्या गर्मीने प्रेग्नंट दीपिका पादुकोण हैराण झाली आहे.
बाळाच्या स्वागतासाठी दीपवीर उत्सुक!
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने मार्च महिन्यात आपण आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. वयाच्या 38 व्या वर्षी दीपिका आई होणार आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण नुकतेच बेबी मूनवर गेले होते. दीपिकाचे बेबी बंप आता दिसायला लागले आहेत. अभिनेत्री सध्या ब्रेकवर आहे. अभिनेत्री सध्या कोणताही चित्रपट करत नसून प्रेग्नंसी प्रीरियड एन्जॉय करताना दिसत आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह सप्टेंबर महिन्यात बाळाचं स्वागत करणार आहेत.
दीपिका गेली ब्रेकवर
दीपिका पादुकोण शेवटची हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) 'फायटर' (Fighter) या चित्रपटात झळकली होती. दीपिकाचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. अभिनेत्री आता बाळाच्या जन्मानंतर एका मोठ्या ब्रेकने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक करू शकते. अभिनेत्री सध्या आयुष्यातील सुखद क्षण एन्जॉय करत आहे. दीपिकाचा 'सिंघम अगेन' (Singham Again) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दीपिका पादुकोण सध्या आपल्या आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पादुकोणसह या चित्रपटात अजय देवगन, करीना कपूर, रणवीर सिंह, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर हे कलाकार झळकणार आहेत. तसेच 'कल्कि 2898' या पॅन इंडिया चित्रपटातही दीपिका दिसणार आहे. दीपिकाच्या या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या
Deepika Padukone-Ranveer Singh : दीपिका बेबी बंपसह मतदानाला, गर्दीत होणाऱ्या आईला सांभाळताना दिसला रणवीर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)