एक्स्प्लोर

Prashant Damle : 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त प्रशांत दामलेंची मोठी घोषणा; राज ठाकरे आणि अशोक सराफ यांच्या हस्ते 'तिकिटालय'चा शुभारंभ

Prashant Damle : 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त प्रशांत दामले यांनी मोठी घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या हस्ते 'तिकिटालय'चा शुभारंभ करण्यात आला आहे.

Prashant Damle : 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, निर्माते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी मोठी घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या हस्ते 'तिकिटालय'चा (Tikitalay) शुभारंभ करण्यात आला आहे.

मराठी सिनेमा, नाटक, गाण्यांचे-कवितांचे, संगीताचे कार्यक्रम, विनोदी प्रहसन अशा विविध मराठी कार्यक्रमांवर मराठी प्रेक्षक  नेहमीच प्रेम करीत आले आहेत. मात्र या कार्यक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत योग्यरीत्या पोहचतेच असं नाही. ही माहिती त्यांच्यापर्यंत सहज पोहचावी आणि घर बसल्या त्यांच्या हक्काचं ‘तिकिट’ उपलब्ध व्हावं हा विचार करून नाटकं, चित्रपट, मैफिली, कॉमेडी शोज, सगळ्यांची तिकीट घेऊन मराठी मनोरंजनाचे ॲप ‘तिकिटालाय’ आलं आहे.       

मराठी मनोरंजनाचे तिकीट काढणाऱ्या रसिकांना भरपूर  माहितीसह एखादं हक्काचं तिकीट बुकिंग ॲप हवं,  या जिद्दीने  प्रशांत दामले, चंद्रकांत लोकरे, अभिजित कदम यांनी एकत्र येत पीएसी थिएटर एंटरटेनमेंट प्रा. लि (PAC) अंतर्गत हे ‘तिकिटालाय’ॲप मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत सादर केलं आहे. 

मराठी माणसांचं मराठी रसिकांसाठी मराठी ॲप ‘तिकिटालय’

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते ‘महाराष्ट्रभूषण’ अशोक सराफ, ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे व मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ‘तिकिटालय’ या मनोरंजनात्मक तिकीट बुकिंग ॲपचा शुभारंभ करण्यात आला. प्रेक्षकांना या ॲपवर हव्या त्या मराठी कार्यक्रमाचं तिकीट घरबसल्या बुक करता येणार आहे. या शुभारंभ सोहळ्याला मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आवर्जून उपस्थित होते.

‘तिकिटालाय’ कसं आहे?

थेट तिकीट काढणाऱ्या प्रेक्षकांना सिनेमा, नाटक व  इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांची संपूर्ण माहिती एकाच प्लॅटफॉर्मवरून पुरवली तर त्याचा फायदानक्की होईल. या ॲपमुळे जगभरातील मराठी प्रेक्षक मोठया प्रमाणात जोडला जाईल. प्रेक्षक त्याच्या आवडीचं सहज शोधेल आणि अवघ्या 3 किल्कवर संपूर्ण माहिती घेऊन तिकीट बुक करू शकेल अशा रीतीने ‘तिकिटालाय’ ॲपची मांडणी केली आहे.  संपूर्ण भारतात हा ॲप कोणीही डाऊनलोड करू शकतो. 

प्रशांत दामलेंनी 'तिकिटालय' का सुरू केलं?  

'तिकिटालय'बद्दल प्रशांत दामले (Prashant Damle) म्हणाले,"मराठी करमणुकीच्या क्षेत्रासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छा गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून माझ्या डोक्यात होती. त्यामुळे ‘तिकिटालय’ या ॲपची संकल्पना मला सुचली. मराठी निर्मात्यांना देखील हे ॲप खूप सोयीचं आहे. मराठी सिनेमा, नाटक याशिवाय या ॲपवर प्रेक्षकांना फक्त मराठी कलाकृती विषयकच माहिती मिळेल’ याचा फायदा जास्तीतजास्त निर्मात्यांनी  घेण्याचे आवाहन ही प्रशांत दामले यांनी यावेळी केले.

मराठी प्रेक्षकांसाठी 'तिकीटालय' नक्कीच उपयुक्त ठरेल : अशोक सराफ

‘मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याचा आग्रह मी नेहमीच धरला आहे. नवनव्या संकल्पना येणं खूप गरजेचं आहे. ‘तिकिटालय’ ची संकल्पना नक्कीच स्तुत्य असून याचा फायदा करून घेणं महत्त्वाचं असल्याचं राजसाहेब ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितलं. ‘गरज शोधा आणि पुरावा’ असं मला नेहमी वाटते त्यानुसार प्रशांत दामले यांनी मनोरंजन क्षेत्राची आजची गरज ओळखून आणलेलं ‘तिकिटालय’ खरंच कौतुकास्पद असल्याची भावना महेश कोठारे यांनी व्यक्त केली. मराठी प्रेक्षकांसाठी हा उपक्रम, हे ॲप नक्कीच उपयुक्त ठरेल’, असं सांगत या नव्या ॲपला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

Sachin Goswami : ललित कला केंद्रात अभाविपच्या कार्यकर्त्यांना घेऊन जा अन्...; सचिन गोस्वामी यांची प्रशांत दामलेंकडे मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Embed widget