Prakash Raj: प्रकाश राज यांच्या ट्वीटनं वेधलं लक्ष; नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करत म्हणाले, 'मला सांगा काय रिकामे आहे?'
Prakash Raj: प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक फोटो ट्विटवर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Prakash Raj: प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. प्रकाश राज हे ट्विटरवर वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडत असतात. नुकतेच प्रकाश राज यांनी एक ट्वीट शेअर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हातात एक फोल्डर दिसत आहे. प्रकाश राज यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो ट्विटवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, '2014 पासून रोज पडलेला प्रश्न:- मला सांगा काय रिकामे आहे? त्यांच्याकडे असणारे फोल्डर, त्यांचा खिसा, की मेंदू?' सध्या प्रकाश राज यांच्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
Daily Quiz since 2014:-
— Prakash Raj (@prakashraaj) September 19, 2023
Tell me whats EMPTY.. the folder he is carrying.. the pocket he fingering.. or the Brain .. #justasking pic.twitter.com/nQ2mzur0I2
प्रकाश राज यांनी याआधी देखील अनेक वेळा नरेंद्र मोदी यांच्याबाबत ट्वीट शेअर केले होते. प्रकाश राज यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोंचा कोलाज काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांचे 20 वेगवेगळ्या लूकमधील फोटो दिसत होते. या फोटोला प्रकाश राज यांनी कॅप्शन दिलं, , 'ओव्हर ड्रेसिंग... ही नवी नग्नता आहे.' त्यांच्या या ट्वीटने देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले होते.
Over Dressing …..is the new Nudity…#justasking pic.twitter.com/svYUZOAdeA
— Prakash Raj (@prakashraaj) December 4, 2022
प्रकाश राज यांनी बॉलिवूडसोबतच साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. तमिल, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये प्रकाश राज यांनी काम केले आहे. त्यांनी केजीएफ, वॉन्टेड,वारिसू यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. सिंघम या चित्रपटामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यांनी जयकांत शिक्रे ही भूमिका साकारली होती. सध्या प्रकाश राज हे त्यांच्या चित्रपटांमुळे नाही तर त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. पुष्पा-2 या चित्रपटामधून ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
