Salaar Postponed : प्रभासच्या 'सालार'ची रिलीज डेट ढकलली पुढे; ख्रिसमसमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Prabhas : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Prabhas Starring KGF 2 Director Salaar To get New Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या त्याच्या आगामी 'सालार' (Salaar) या सिनेमामुळे चर्चेत आहे. येत्या 28 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. रिलीज डेट पुढे ढकलल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत आहेत.
'सालार' कधी प्रदर्शित होणार? (Salaar Release Date)
'सालार' या बहुचर्चित दाक्षिणात्य सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. निर्मात्यांनी स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 'सालार' हा सिनेमा आता 'नाताळ 2023'मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'सालार'च्या निर्मात्यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"सालार' या सिनेमाला तुमचं समर्थन मिळत आहे याबद्दल आभार. काही कारणाने आम्ही या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलत आहोत. आता हा सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमच्या या निर्णयाचा आदर करा".
View this post on Instagram
निर्मात्यांनी पुढे लिहिलं आहे,"सालार' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही खूप विचार करुन घेतला आहे. चांगल्या सिनेमाची निर्मिती करण्यासाठी आमची टीम सज्ज आहे. सिनेमा अधिक चांगला होण्यासाठी आमची टीम मेहनत घेत आहे. लवकरच या सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर करू. तुमचा विश्वास आणि प्रेम असेच कायम राहुद्या".
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा सिनेमा येत्या नाताळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होईल. 'जवान' (Jawan) या सिनेमाची कमाई पाहता प्रभासने त्याच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असल्याचं म्हटलं गेलं. पण आता शाहरुखचा (Shah Rukh Khan) आगामी 'डंकी' (Dunky) हा सिनेमादेखील डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळेल. पण प्रभास (Prabhas) आणि शाहरुख (Shah Rukh Khan) मात्र आमने-सामने येतील. प्रभासच्या 'सालार' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या