Salaar 2 : 'सालार 2'मध्ये 'या' अभिनेत्याची एन्ट्री! प्रभासचा आहे जिगरी यार
Salaar 2 : 'सालार 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आता प्रभासच्या खास मित्राची एन्ट्री होणार आहे.
Gopichand in Salaar 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) 'सालार' (Salaar) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. दरम्यान प्रभासच्या 'सालार 2'मध्ये (Salaar 2) आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाल्याचं समोर आलं आहे.
प्रभास सध्या त्याच्या आगामी 'सालार 2' (Salaar 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रशांत नील या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 'सालार' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'सालार 2'देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करेल, असे म्हटले जात आहे. सिनेप्रेक्षकांना आता फक्त या सिनेमाच्या रिलीजची उत्सुकता आहे.
'सालार 2' कधी रिलीज होणार? (Salaar 2 Release Date)
मीडिया रिपोर्टनुसार, 'सालार 2'साठी प्रेक्षकांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. प्रभास आणि प्रशांत नील लवकरच या सिनेमाच्या रिलीजची घोषणा करतील. सध्या या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचं काम सुरू आहे. या वर्षात नोव्हेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होईल, असे म्हटले जात आहे. अशातच आता या सिनेमात एका दाक्षिणात्य सुपरस्टारची एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार गोपीचंद
मीडिया रिपोर्टनुसार, प्रभासच्या आगामी 'सालार 2' या सिनेमात त्याचा खास मित्र गोपीचंदची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. या सिनेमातील एका खास भूमिकेसाठी निर्मात्यांनी गोपीचंद यांना विचारणा केली आहे. गोपीचंदची 'सालार 2'मध्ये एन्ट्री झाल्याने चाहत्यांना आता या सिनेमाची प्रतीक्षा आहे. गोपीचंद दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे.
गोपीचंद दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असण्यासोबत प्रभासचा खास मित्रदेखील आहे. अनेक वर्षांपासून त्यांची चांगली मैत्री आहे. दोघांचा सिनेप्रवास एकत्र सुरू झाला होता. 2004 मध्ये आलेल्या 'वर्षम' या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं होतं. या सिनेमात गोपीचंद खलनायकाच्या भूमिकेत होता. या सिनेमातील त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. आता पुन्हा एकदा 'सालार 2'मध्ये प्रभास आणि गोपीचंद एकत्र झळकणार आहेत.
गोपीचंदचा पहिला पॅन इंडिया सिनेमा 'सालार 2'
गोपीचंद 'सालार 2' या सिनेमासाठी होणार देईल असे म्हटले जात आहे. हा त्याचा पहिला पॅन इंडिया सिनेमा आहे. गोपीचंद अनेक सुपरहिट सिनेमांचा भाग आहे. पण स्टारडमच्या बाबतीत मात्र तो मागे पडला आहे. पण आता दोन्ही हरहुन्नरी अभिनेते एकत्र बॉक्स ऑफिस गाजवतील असे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या